Ira Khan and Nupur Shikhare's wedding  Esakal
मनोरंजन

Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आमिर खानची लेक अखेर लग्नबंधनात! आयरा-नुपूरचं मराठमोळ्या थाटात पार पडलं शुभमंगल

आयरा आणि नुपूरने नुकतेच कोर्ट मॅरेज केले आहे. सध्या हे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Vaishali Patil

Ira Khan-Nupur Shikhare Wedding: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज लेकीच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत होता. आज त्याच्या घरी आज उत्सवाचं वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दिवसाची प्रतिक्षा आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे करत होता तो दिवस आज अखेर आला. आयरा आणि नुपूरने कोर्ट मॅरेज केले आहे. कोर्ट मॅरेज करत दोघांनी लग्नगाठ बांधली.

यावेळी आयरा आणि नुपूरसोबत सर्व खान आणि शिखरे कुटूंब उपस्थीत होतं. यावेळी आयरा नववधूच्या रुपात खुपच देखणी दिसत होती मात्र नुपुरच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. नुपुरेने हाफ पँट आणि टी-शर्ट मध्ये आयरासोबत लग्न केलं. नेटकरी त्यांचे कौतुक करत आहे. तर नव्या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील करत आहेत.

आमिर खानच्या लेकीच्या लग्नाला मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे दोघेही खास पाहुणे म्हणून उपस्थीत होते.

मित्रांसोबत लग्नाची मिरवणूक घेऊन नुपूर ताज लँड्स एंडच्या बाहेर पोहोचला होता. यादरम्यान नुपूर जिमच्या कपड्यांमध्ये धावत किंवा जॉगिंग करत तिथे पोहचला. त्याने ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला आणि कुटुंबासोबत भरपूर डान्सही केला. नुपूरचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काल आयरा खानचे लग्नापुर्वीचे विधी पार पडले होते. सलमान खानच्या घरी आमिरच्या मुलीचा मेहंदी सोहळा पार पडला. तर आमिरच्या पुर्व पत्नीचा मराठमोळा लूकही सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

कोर्ट मॅरेजनंतर आयरा आणि नुपूर मुंबईतील वांद्रे भागातील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये संध्याकाळी ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहेत. खान आणि शिखरे कुटुंबीय या रिसेप्शन पार्टीला उपस्थित राहणार आहेत. या पार्टीत शाहरुख खानपासून ते सलमान खानपर्यंत सर्व कलाकार उपस्थीत राहण्याची शक्यता आहे.

रिसेप्शननंतर आमिरची लेक आणि जावई नुपूर उदयपूरला दुसऱ्या लग्नासाठी रवाना होणार आहे. तेथे या जोडप्याचा शाही विवाह 8 जानेवारीला पार पडणार आहे. त्यानंतर 13 जानेवारीला मुंबईतील एका हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शनही पार पडणार आहे.

आयरा खानचा होणारा पती नुपूर शिखरे हा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे. तो आमिर खानचा ट्रेनरही असून तो आयरालाही फिटनेस ट्रेनिंग देत होता. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केल्याचे सांगितले जाते.

नुपूर बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा देखील ट्रेनर आहे. आयरा आणि नुपूर या दोघीही एकमेकांच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहेत. आता त्याच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT