Aastad Kale entry in Karan Gunhyala Mafi Nahi serial on sony marathi sakal
मनोरंजन

Aastad Kale: खादीचा कोट आणि भलताच रुबाब! अभिनेता आस्ताद काळे 'राजकीय' भूमिकेत..

'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत आस्ताद काळे महत्वाच्या भूमिकेत!

नीलेश अडसूळ

Karan Gunhyala Mafi Nahi: नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून घराघरात पोहोचलेला नट म्हणजे अभिनेता आस्ताद काळे. तो केवळ अभिनयच नाही तर सामाजिक आणि राजकीय घडामोडींबाबतहि सक्रीय असतो.

आस्तादने आजवर बऱ्याच मालिका केल्या आहेत. पण आता आस्ताद एका नव्या भूमिकेत येत आहे. पहिल्यांदाच तो एका राजकीय भूमिकेत समोर येणार आहे. त्यांच्यासाठी ही भूमिका अत्यंत वेगळी असून त्याचा पहिला लुक समोर आला आहे.

शुभ्र पांढरे कपडे, अंगावर कोट आणि एखाद्या राजकीय नेत्यासारखाच त्याचा रुबाब पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया त्याच्या नव्या भूमिकेविषयी..

(Aastad Kale entry in Karan Gunhyala Mafi Nahi serial on sony marathi)

सोनी मराठी वाहिनी वर ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही नवी थरारक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्याची झलक प्रेक्षकांना आवडली आहे. या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेत.

निरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ACP अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. सोबतच रूपल नंद हीसुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे.

आता या मालिकेत प्रवेश होणार आहे एका नवीन व्यक्तिरेखेचा. आस्ताद काळे हा अभिनेता नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसतो. 'कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेत आस्ताद एका नेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सुहास साटम असे या नेत्याचे नाव असून आता मालिकेत त्याच्या येण्याने कथानक वेगळे वळण घेणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत कलाकारांची चांगली फळी प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. त्यात आता आस्ताद काळेच्या येण्याने मालिकेत एक वेगळी रंगत पाहायला मिळेल. एका पेक्षा एक वरचढ कलाकार एकाच वेळेला जेव्हा एकाच मालिकेत दिसतील, तेव्हा 'कारण गुन्ह्याला माफी नाही' या थरारक मालिकेत जे वेगळेपण येईल ते पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच मजेशीर असेल.

लेखक चिन्मय मांडलेकर, दिग्दर्शक भीमराव मुडे आणि निर्माती मनवा नाईक यांचादेखील सोनी मराठी वाहिनीसाठी, मालिकेसाठी चांगलाच हातभार लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Walmik Karad: ''सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर '' बीडच्या जेलमधून नवीनच कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Viral Video : मी पण चाललो, तुम्ही पण निघा आता! मुंबई इंडियन्सचा पराभव दिसताच Akash Ambani यांनी चाहत्यांना केला इशारा

मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून वृद्ध वडिलांना अमानुष मारहाण, लघवीही पाजली...

MLC Election 2026: विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का! पराभूत दिग्गजांना 'नो एंट्री'; भाजपची ‘नो रिपीट’ पॉलिसी लागू

“हा विजय त्यालाच…” ऋतुराज गायकवाड झाला भावूक; मुकेश चौधरीला विजय समर्पित..

SCROLL FOR NEXT