Abhidnya Bhave celebrates her birthday with her furry friends- Street Dog's and Cats Google
मनोरंजन

Video: भटक्या कुत्र्यांसोबत वाढदिवशी रमली अभिनेत्री अभिज्ञा भावे

अभिज्ञा भावेनं आपल्या वाढदिवशी 'Stray Dog's Shelter' ला भेट देऊन यंदाचा आपला वाढदिस स्पेशल बनवला.

प्रणाली मोरे

अभिनेत्री अभिज्ञा भावेनं(Abhidnya Bhave) केवळ मराठीच नाही तर हिंदी मालिकांमधनही काम करुन आपली ओळख निर्माण केली आहे. 'पवित्र रिश्ता २' मध्ये ती अंकिता लोखंडे सोबत काम करताना दिसत आहे. अभिज्ञानं मालिकांमधून नेहमी खलनायिका पात्र रंगवून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिज्ञाला मुक्या प्राण्यांविषयी खूप प्रेम आहे. पण यासाठी केवळ घरात त्यांना पाळलं यावर ती समाधानी नाही तर ती खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी जमेल तंस कामही करते हे नुकतंच तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिसून आलं आहे.

आज असे आपण किती जणं असू जे रस्त्यावर एखादा मुका प्राणी जखमी झालाय,किंवा त्याला पाणी हवंय,तो भुकेनं व्याकूळ दिसतोय हे पाहिल्यावर किंवा लक्षात आल्यावर त्याच्या जवळ जातो आणि मदत करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात आपल्यापैकी खूप कमी जणं असे करत असतील. अनेकदा मदत कराविशी वाटत असूनही आपण घाबरून दूर पळतो,त्यांंना दगड मारतो. पण समाजात काही असे लोक आहेत जे या रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या मुक्या प्राण्याचे मदतनीस आहेत. त्यांच्यासाठी मनापासून काहीतरी ते करतात. यात सर्वसामान्यांपासून काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. मराठी-हिंदी मालिकांतून काम करणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे ही त्यापैकीच एक.

अभिज्ञानं यंदा आपला वाढदिवस खूप आगळ्या-वेगळ्या पद्धथीनं साजरा केला. तिनं आपला पती मेहूल पै सोबत जवळपासच्या काही स्ट्रे डॉग्ज शेल्टरना भेट देऊन त्यांच्यासोबत आपला वाढदिवसाचा दिवस साजरा केला. तिनं त्या संदर्भात व्हिडीओ पोस्ट शेअर केलीय. तिनं व्हिडिओ पोस्ट करताना लोकांना आवाहन केलंय की मुक्या प्राण्यांना आपली गरज असते तेव्हा सहाय्य करा. ते स्वतःची मदत करण्यात असमर्थ असातात तेव्हा त्यांना दगड न मारता समजून घ्या. तिनं खूप काकुळतीनं ही पोस्ट लिहिली आहे. बातमीत तिची पोस्ट आणि तिनं भटक्या कुत्त्र्यांसोबत साजरा केलेल्या आगळ्या-वेगळ्या वाढदिवसाचा व्हिडीओ जोडला आहे. अभिज्ञा भावे हिचा नवरा मेहूल पै हा सध्या कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवासंपूर्वी मेहूलनेच यासंदर्भात माहिती दिली होती. मेहूलही तिचा हा आगळा-वेगळा वाढदिवस साजरा करताना तिच्यासोबतच होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT