Actor Lee Sun-kyun of Oscar-winning film 'Parasite' is dead SAKAL
मनोरंजन

Lee Sun-kyun Death: ऑस्कर विजेत्या 'पॅरासाईट' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं दुःखद निधन

ऑस्कर विजेत्या पॅरासाईट मधील लोकप्रिय अभिनेत्याचं निधन

Devendra Jadhav

Lee Sun-kyun Death News: दक्षिण कोरियातून एक मोठी बातमी समोर येतेय. ऑस्कर-विजेता चित्रपट "पॅरासाइट" मधील अभिनेता ली सन-क्यूनचं निधन झालंय. दक्षिण कोरियाच्या कार्यालयाने ही दुःखद बातमी सर्वांना दिली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी एका अज्ञात ठिकाणी बेशुद्धअवस्थेत असलेल्या अभिनेत्याला शोधून काढले

योनहाप वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी ली सोल पार्कींगमधील कारमध्ये मृतावस्थेत आढळल्याचे वृत्त दिले आहे.

लीने बुधवारी सुसाईड नोट लिहून घर सोडले. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

अनेक दक्षिण कोरियाच्या वृत्तसंस्थांनी ली सन क्यून यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपुर्वी अंमली पदार्थाच्या सेवनाच्या संशयावरून अभिनेत्याची चौकशी सुरू होती. सूम्पीने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांना एका महिलेचा फोन आला यात सुसाईड नोट लिहून तिचा पती घरातून निघून गेला आहे, अशी तक्रार नोंदवण्यात आली होती.

नंतर, पोलिसांनी शोध घेताच त्यांना घरातून बेपत्ता झालेला दुसरा तिसरा कोणी नसून ली सन क्यून असल्याची माहिती मिळाली. पोलिसांना लीच्या कारमध्ये जळलेल्या कोळशाचे पुरावे सापडले. त्यामुळेच लीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ऑक्टोबरमध्ये त्याच्यावर बेकायदेशीर अंमली पदार्थ वापरल्याचा आरोप होता आणि तेव्हापासून लीची चौकशी सुरू होती.

ली सन क्यूनने अनेक वर्षांपासून दक्षिण कोरियामधील सिनेमांमध्ये काम केले. 'पॅरासाइट' हा त्यांचा सर्वात मोठा आणि गाजलेला चित्रपट होता. हा चित्रपट ऑस्कर जिंकण्यातही यशस्वी ठरला होता. याशिवाय लीने 'माय मिस्टर', 'कॉफी प्रिन्स माय स्वीट सोल', 'मिस कोरिया' आणि 'ए हार्ड डे' मध्ये देखील भूमिका केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT