Actress Amruta khanvilkar wishes husband himanshu malhotra marriage anniversary  
मनोरंजन

अमृता-हिमांशू यांची 'रब ने बनादी जोडी', 16 वर्षांच्या प्रेमाची स्टोरी वाचा

वृत्तसंस्था

मुंबई : सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी यांच्यात लव्ह-अफेअर आणि ब्रेकअप हे काही नवीन नाही. शिवाय आजच्या जमान्यात खरं प्रेम शोधणं अवघड आहे असं म्हणणारे ही अऩेक आहेत. एका बाजुला असणारे असे तर्क आणि दुसऱ्या बाजुला याला चुकिचे ठरवणारे कलाकार मंडळी आहेत. मराठी आणि हिंदी असं कॉम्बिनेशन असणारं एक कपल आहे. ज्यांनी प्रेमाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीची ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचा नवरा हिमांशू मल्होत्रा हे दोघे खऱ्या अर्थाने कपल गोल्स आहेत, जाणून घ्या कसे ?

अमृताचा आणि नवरा हिमांशू यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. तुम्हाला हे वाचून कदाचित धक्का बसेल पण, ते दोघं 16 वर्षे एकत्र आहेत. अमृता आणि हिमांशू यांचं एकदुसऱ्यावर जिवापाड प्रेम आहे हे सर्वांनाच माहित आहे. ला़डक्या नवऱ्यासाठी अमृताने लग्नाच्या वाढदिवासाच्या शुभेच्छा देताना एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हिमांशूने इन्स्टाग्रामवर त्य़ा दोघांच्या हातात हात घेतलेला रोमॅंटिक फोटो शेअर करत सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत अमृताने ते सर्व कॅप्शनमध्ये मांडलं आहे. ''16 वर्षांचं आपलं प्रेम आणि लग्नाची 5 वर्ष, यामध्ये अनेक चढ-उतार आहेत, मजा मस्तीही आहे. नेहमी माझ्यासोबत राहण्यासाठी, सांभाळून घेण्यासाठी तुझे आभार. मला एक चांगली व्यक्ती बनवण्यासाठी आभार. माझ्या आयुष्यात तुझी जागा ही खूपच खास आहे.''

अमृता आणि हिमांशू खऱ्या अर्थाने 'मेड फॉर इच अदर' आहेत. 11 वर्षे त्या दोघांनी डेट केलं आणि 24 जानेवारी 2015 ला ते लग्नबंधनात अडकले. 'इंडियाज सिनेस्टार की खोज' या कार्यक्रमाच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं आणि आज ते दोघेही जीवनसाथीच्या रुपाने एकत्र आहेत. हिमांशू पंजाबी आहे तर अमृता मराठमोळी मुलगी. हिमांशू हिंदी मालिका आणि अनेक कार्यक्रमांमधून काम करतो. तर, अमृताने मराठी आणि बॉलिवूडमध्ये नाव कमावलं आहे. हे कपल 'नच बलिये' या डान्स प्रोग्राममध्येही एकत्र झळकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Nepal Dispute: बालेन शाहांवर दबाव वाढला, तरीही शांत; पण नेपाळ सरकारने सीमा वाद मिटवण्यासाठी उचललं पाऊल

CJPचा संस्थापक अभिजीत दिपके भारतात येणार, आई-वडिलांना चिंता, घर सोडून अज्ञातस्थळी

पहिलीच मालिका गाजली तरीही छोट्या पडद्यावरून का गायब होती दीपा परब? स्वतः सांगितलं कारण, म्हणाली-

Salary System News: भारतीयांना आता महिन्यात दोन वेळा मिळणार पगार? कोणी दिला प्रस्ताव? कर्मचाऱ्यांच्या मनात उत्सुकता

INDW vs ENGW: वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाला बसला मोठा धक्का; इंग्लंडमध्ये खेळताना 'या' एका चुकीमुळे टीम इंडियाने मालिका गमावली!

SCROLL FOR NEXT