Tunisha Sharma Esakal
मनोरंजन

Tunisha Sharma: प्रेस घेत पोलिसांनी केले अनेक खुलासे.. शिझानला 4 दिवसांची पोलिस कोठडी..

सकाळ डिजिटल टीम

तुनिषा आत्महत्या प्रकरणी टीव्ही अभिनेता शीझान खानला पोलिसांनी अटक केली होती. त्याला 25 डिसेंबर रोजी वसई न्यायालयात हजर केले असता, त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी कोर्टाकडे 7 दिवसांची कोठडी मागितली होती.

अभिनेत्रीच्या आत्महत्येपासून ते पोस्टमॉर्टमपर्यंत तनुषा गर्भवती असल्याची तसेच हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याच्या अशा अनेक गोष्टींचा दावा करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. खुद्द पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व गोष्टींचा पर्दाफाश केला आहे.

मुंबईचे एसीपी चंद्रकांत जाधव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, 'पोस्टमॉर्टममध्ये हे स्पष्ट झालं आहे की फाशी घेतल्यामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळे खून प्रकरणाचा तपास होऊ शकत नाही. शीझान खानला आज आम्ही न्यायालयात हजर केलं. त्याला ४ दिवसांची कोठडी मिळाली. आम्ही त्यांची चौकशी करू. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आतापर्यंतच्या तपासात असं समोर आलयं आहे की, ब्रेकअपमुळे तुनिषा खूपच अस्वस्थ झाली होती.

पुढे पोलिस म्हणतात, 'तुनिषानं तिच्या आईलाही सांगितलं होतं की, या मुलानं माझ्याशी ब्रेकअप केले आहे, तो बोलत नाही. आम्ही तपास करत आहोत, जे काही समोर येईल, कोणाचं नाव पुढे येईल, आम्ही सर्वांची चौकशी करू. प्रेग्नंसीची चर्चा निराधार आहे. असंही काहीही समोर आलेले नाही. फाशीमुळे मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झाले आहे. लव्ह जिहाद आणि एक्स्ट्रा अफेअरबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

IND vs NZ T20 : भारतीय संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे इशान किशन दुसऱ्या टी-२० सामन्याला मुकणार

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Gold Price fall before Dhanteras Diwali : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी स्वस्त! एकाच झटक्यात दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे भाव..!

फटाके बनवताना भीषण स्फोट! ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT