urmila 
मनोरंजन

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अभिनय क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात गेलेल्या उर्मिला मातोंडकरचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. उर्मिलाने याची संबंधित तक्रार महाराष्ट्र पोलिस सायबर सेलमध्ये दाखल केली आहे. याबाबतची माहिती उर्मिलाने स्वतः तिच्या एक दुस-या एका सोशल मिडिया अकाऊंटवरुन दिली आहे. 

उर्मिला मातोंडकरने पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासोबतंच तिने तिच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. उर्मिलाने ट्विट करत म्हटलंय की 'माझं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. पहिले त्यांनी डीएम म्हणजेच डायरेक्ट मेसेज करुन अकाऊंट वेरिफाय करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करायला सांगितल्या आणि नंतर अकाऊंच हॅक केलं. खरंच??'

त्यानंतर उर्मिलाने दुस-या एका ट्विटमध्ये सांगितलं की तिने या घटनेची एफआयआर महाराष्ट्र सायबर सेलमध्ये दाखल केली आहे. यासोबतंच उर्मिलाने विनंती केली आहे की 'सायबर हल्ल्यांना हलक्यामध्ये घेऊ नका. महिलांनी सायबर हल्ल्यांना कमी समजू नये. मी जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये माझं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची एफआयआर दाखल करण्यासाठी गेले तेव्हा तेथील मुंबई पोलिस सायबर हल्ल्याच्या उपायुक्त रश्मी करंदीकर भेटल्या आणि त्यांनी मला याविषयीची अधिक माहिती दिली. ही माहिती निश्चितंच मला भविष्यात कामी येईल.'

उर्मिला मातोंडकर पहिली अभिनेत्री नाहिये जिचं सोशल मिडिया अकाऊंट हॅक झालं आहे. याआधी अनेक सेलिब्रिटींचे सोशल मिडिया अकाऊंट हॅक झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सुष्मिता सेनची मुलगी रेनेचं इंस्टाग्राम अकाऊंच हॅक झालं होतं ज्याची तक्रार तिने पोलिसांत केली होती. सोबतंच सोशळ मिडियानरुन देखील माहिती दिली होती.   

actress urmila matondkar instagram account hacked  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT