Aishwarya narkar and avinash narkar  Esakal
मनोरंजन

VIDEO: शाहरुख आणि माधुरीच्या गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा जबरदस्त डान्स; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

Aishwarya Narkar And Avinash Narkar: नुकताच ऐश्वर्या आणि अविनाश यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

priyanka kulkarni

Aishwarya Narkar And Avinash Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कपल आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. ऐश्वर्या आणि अविनाश हे त्यांच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. नुकताच ऐश्वर्या आणि अविनाश यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

अविनाश आणि ऐश्वर्या यांचा जबरदस्त डान्स

अविनाश आणि ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते दोघे शाहरुख खान, माधुरी दीक्षित यांच्या दिल तो पागल है या सिनेमातील ढोलना या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला अविनाश आणि ऐश्वर्या यांनी कॅप्शन दिलं, "सर्वात सुंदर जोडप्याच्या पुरस्कारासाठी आमचे हे सबमिशन आहे". अविनाश आणि ऐश्वर्या यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

तितिक्षा तावडे, कोकण हार्टेड गर्ल, सुरुची अडारकर यांनी अविनाश आणि ऐश्वर्या यांच्या व्हिडीओला कमेंट केल्या आहे. कोकण हार्टेड गर्लनं या व्हिडीओला कमेंट केली, मला तुम्ही दोघे खूप आवडता. तर तितिक्षा तावडेनं 'गोड', अशी कमेंट केली आहे.

पाहा व्हिडीओ:

अविनाश आणि ऐश्वर्या यांचे चित्रपट आणि मालिका

दुहेरी, महाश्वेता ,या सुखांनो या,सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकांमध्ये ऐश्वर्यानं काम केलं. अविनाश यांनी देखील चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी फकाट, उदय आणि कॉफी आणि बरंच काही या चित्रटात काम केलं आहे. ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवर 292k फॉलोवर्स आहेत. तर अविनाश यांना सोशल मीडियावर 45.4k फॉलोवर्स आहेत.अविनाश आणि ऐश्वर्या हे दोघे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम! तेलापासून मसाल्यांपर्यंत अनेक वस्तू महाग, जाणून घ्या यादी...

Latest Marathi News Live Update : रिसोड शहरालगत असलेल्या पावर हाऊस परिसरातील खुल्या जागेत लागली आग

Holi 2026: मुख्यमंत्री निवासात होळीचा थाट! फुलांच्या वर्षावात साजरी झाली रंगपंचमी; मयूर नृत्य आणि पारंपरिक गाण्यांनी लुटला आनंद

Nashik Car Accident : सार्थकच्या जाण्याने आईचा आधार हरपला; वडिलांचे कोरोनात निधन, आता एकुलता एक मुलगाही गेला

गॅस बंद करायला विसरली आणि आगीचा भडका उडाला ; जीवानिशी वाचलेली मराठी अभिनेत्री

SCROLL FOR NEXT