Nagarjuna,Samantha Prabhu, Naga Chaitanya Google
मनोरंजन

नागार्जुन यांचा समंथा-नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाविषयी मोठा खुलासा

दोघांपैकी कोणाला घटस्फोट हवा होता याविषयी अभिनेत्याने भाष्य केले आहे

प्रणाली मोरे

अभिनेत्री समंथा (Samantha) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांना घटस्फोटाबद्दल माहिती दिली. काही दिवसांपूर्वी नागा चैतन्यने एका मुलाखतीमध्ये समंथासोबतच्या घटस्फोटाबद्दल त्याचे मत व्यक्त केले होते. आता याविषयी नागा चैतन्यचे वडील अभिनेता नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna Akkineni) यांनी माहिती दिली आहे.

एका मुलाखतीमध्ये नागार्जुन यांनी सांगितले की, 'सर्वात आधी समंथानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नागा चैतन्यनं तिचा निर्णय स्वीकारला. त्या दोघांना माझी काळजी होती. त्यांना वाटत होते की मी त्यांच्या या निर्णयाबाबत काय मत मांडेल? किंवा आपल्या कुटुंबाचे काय होईल? त्यांच्या लग्नाला चार वर्ष झाली होती. तेव्हा दोघांमध्ये कोणतेही मतभेद नव्हते. त्या दोघांनी 2021 चे न्यू ईअर एकत्र साजरे केले.जेव्हा ते दोघे रिलेशनमध्ये आले तेव्हा सर्वात आधी त्यांच्या नात्याबद्दल मला माहित होते.'समंथानं तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या होत्या. ती पोस्ट समंथानं काही दिवसांपूर्वी डिलीट केली. त्यामुळे आता समंथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

Yerawada Fire Station Darkness : येरवड्यातील अग्निशमाक केंद्र अंधारात; चार दिवसांपासून वीज पुरवठा बंद

SCROLL FOR NEXT