akshay kumar 
मनोरंजन

व्हिडिओ: अक्षय कुमारसोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी हॉटेल बाहेर लावली लांबच लांब रांग

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'बेलबॉटम' या सिनेमाच्या शूटींगसाठी ग्लासगोमध्ये आहे. या सिनेमाचं शूटींग कोरोना व्हायरसच्या कारणामुळे खूप दिवसांपासून रखडलं होतं. या शूटींगमधून थोडं फ्री झाल्यावर अक्षय कुमारने एक असं काम केलं आहे ज्यामुळे त्याचे चाहते खूप खुश झाले आहेत. या व्हिडिओमध्ये चाहत्यांच्या चेह-यावरचा आनंदच खूप काही सांगून जातोय.

बॉलीवूडचा खिलाडी कुमार ग्लासगोमध्ये त्याच्या हॉटेलच्या बाहेर चाहत्यांसोबत फोटो क्लिक करताना दिसून आला. विशेष म्हणजे धक्काबुक्की करत गर्दी न करत इथे एक शिस्त पाहायला मिळाली. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो मिळावी यासाठी त्याच्या हॉटेलबाहेर रांग लावली होती. अक्षयने चाहत्यांची ही शिस्त पाहून सगळ्यांना खुश केलं आणि एकानंतर एक सगळ्या चाहत्यांसोबत फोटो क्लिक करत त्यांच्याशी थोडी बातचीत करत त्यांना खुश केलं. अक्षयचा हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलाच हिट ठरतोय. कोणत्याच चाहत्याला नाराज न करता त्याने प्रत्येकाला फोटो क्लिक करण्याची संधी दिल्याने तो चाहत्यांसाठी खरा हिरो ठरलाय. 

रणजीत तिवारी दिग्दर्शित 'बेलबॉटम' या सिनेमात वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा खुरेशी महत्वाच्या भूमिकेत आहेत. लॉकडाऊननंतर शूटींगला सगळ्यात आधी सुरुवात करणारा बेलबॉटम हा पहिला सिनेमा आहे. लॉकडाऊननंतर हा पहिला सिनेमा आहे जो शूटींगसाठी देशाबाहेर गेला होता. अक्षय कुमार लवकरंच त्याचं स्कॉटलँडमधील शूटींग संपवून त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी मुंबईला येणार असल्याची चर्चा आहे.   

akshay kumar poses for pictures with fans gathered outside his hotel in glasgow  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT