Akshay Kumar Sarfira Remake esakal
मनोरंजन

Akshay Kumar New Movie: साऊथच्या 'सूर्या'च्या प्रसिद्ध चित्रपटाचा रिमेक घेऊन येतोय 'अक्षय कुमार', रिलीज डेटही केली जाहीर

अक्षय कुमारनं (Akshay Kumar New Movie) त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली असून तो साऊथच्या प्रसिद्ध चित्रपटाचा रिमेक असणार आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Akshay Kumar Sarfira Remake : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारसाठी भलेही गेलं वर्ष फारसं लाभदायी ठरलं नसेल मात्र आता नव्या वर्षात त्याचे (Akshay Kumar Latest News) वेगवेगळे प्रोजेक्ट समोर येताना दिसत आहेत. यात त्यानं साऊथच्या एका प्रसिद्ध चित्रपटाचा रिमेक करणार असल्याची घोषणा करत त्याची रिलिज डेटही चाहत्यांना सांगून टाकली आहे.

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता सूर्याच्या सोरारई पोटरु नावाच्या चित्रपटाचा (Soorarai Pottru Movie remake) हिंदी रिमेक अक्षय कुमार करतो आहे. त्यामध्ये तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ओएमजी २ नंतर अक्षय कुमारचा (Akshay Kumar New movie) नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारचा मिशन रानीगंजमध्ये देखील अक्षय कुमार वेगळ्या भूमिकेत दिसला होता. मात्र हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे यशस्वी झाले नाहीत.

यापूर्वी देखील अक्षयनं साऊथच्या चित्रपटांचा रिमेक केल्याचे दिसून आले (Akshay Kumar Sarfira Movie) आहे. त्यात त्याला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. खर तर अक्षय कुमार ज्या हिंदी चित्रपटाचा रिमेक घेऊन येतो आहे त्याचे हिंदी डबिंग पूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. सूर्याचा तो चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Akshay Kumar Sarfira Remake

अक्षय कुमारनं त्याच्या इंस्टावरुन याविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यानं सरफिरा चित्रपटातील एका दृश्याचा फोटो शेयर केला आहे. ज्यात तो अक्षय कुमार बाईक चालवताना दिसतो आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमारच्या आगामी प्रोजेक्टची चर्चा सुरु होती. आता प्रेक्षकांना अन् त्याच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. हा चित्रपट १२ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय अक्षय कुमारचा आगामी काळात बडे मिया छोटे मिया नावाचा चित्रपट येणार आहे. त्यात तो पहिल्यांदा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या एप्रिल महिन्यात ईदच्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT