Alia and Ranbir Kapoors revealed their Daughter Raha Face on the Occasion of christmas SAKAL
मनोरंजन

Ranbir - Alia Daughter Raha: आलिया - रणबीरने ख्रिसमसच्या मुहूर्तावर दाखवला लेकीचा चेहरा, व्हिडीओ व्हायरल

रणबीर - आलियाने ख्रिसमसच्या मुहूर्तावर लेक राहाला सर्वांसमोर आणलंय

Devendra Jadhav

Ranbir - Alia Daughter Raha Video: सध्या रणबीर कपूर - आलिया भट्ट मनोरंजन विश्वात चांगलेच चर्चेत आहेत. रणबीर कपूरचा अॅनिमल सिनेमा सध्या गाजतोय. तर आलिया सुद्धा गंगूबाई काठियावाडी, रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमातून लोकांच्या भेटीला आलंय.

रणबीर - आलियाला राहा ही मुलगी आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. राहाच्या जन्मानंतर रणबीर - आलियाने तिला समाजमाध्यमांपासून काहीसं दूर ठेवलं होतं. पण आज ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर - आलियाने लेकीला सर्वांसमोर आणलंय. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

रणबीर - आलियाची क्यूट लेक राहा

रणबीर - आलिया हे दोघं आज ख्रिसमसच्या निमित्ताने मीडियासमोर आले. पण यावेळी त्यांच्यासोबत त्यांची लेक राहा होती. राहाला रणबीरने कडेवर घेतलं होतं.

राहा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुपच क्यूट दिसत होती. तिने तिच्या नाजूक हातांनी आई - बाबांचा चेहरा पकडला होता. समोर असलेली मीडिया रणबीर - आलियाच्या लेकीचं कौतुक करत होतं. रणबीर - आलिया सुद्धा सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते.

 राहाबद्दल थोडंसं...

काही वर्षे डेटिंग केल्यानंतर आलिया आणि रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली होती. रणबीरच्या मुंबईतील 'वास्तू' या निवासस्थानी हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर जवळपास २ महिन्यानंतर आलियाने आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली अन् त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलियानं एका परिला जन्म दिला. तिचं नाव ठेवण्यात आलं राहा.

लेकीच्या जन्माच्यावेळी बार्सिलोनाची जर्सी केलेली शेअर

अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या नावाची घोषणा करत तिचा एक ब्लर फोटो शेअर केला होता. या जोडप्यानं मुलीचं नाव राहा कपूर असं ठेवलं. लेकीच्या जन्मावेळी फोटोसोबत त्यांनी मिनी बार्सिलोनाच्या जर्सीची झलक शेअर केली होती. ज्यावर राहा नाव लिहिलेलं दिसतंय. नाव समोर आल्यानंतर तिच्यावर कौतूक आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi: दिवाळीपूर्वी पीएम किसानचे २,००० रुपये मिळणार शेतकऱ्यांना मिळणार का? २४व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

Asian Para Games : नाशिकच्या Dilip Gavitची 'सुवर्ण' धाव! सिमरनने स्पर्धा विक्रमासह जिंकले गोल्ड; भारताचे पदकांचे अर्धशतक...

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक, मतदानासाठी कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत

SA vs AUS 2nd Test : दक्षिण आफ्रिकेने 'फास' आवळला! रबाडाच्या 154.5 kph वेगाच्या चेंडूने हेड हडबडला... यान्सेनने करेक्ट कार्यक्रम केला

SCROLL FOR NEXT