Alia Bhatt Latest News Alia Bhatt Latest News
मनोरंजन

Alia Bhatt: बाळंत होण्यापूर्वी आलियाचा मोठा निर्णय, करिअरला लागणार ब्रेक?

बॉलीवूडची स्टार अभिनेत्री आलिया भट्ट ही प्रेग्नंट असल्याची बातमी व्हायरल झाली आणि चाहत्यांना कमालीचा आनंद झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

Alia Bhatt Baby: बॉलीवूडची स्टार अभिनेत्री आलिया भट्ट ही प्रेग्नंट असल्याची बातमी व्हायरल झाली आणि चाहत्यांना कमालीचा आनंद झाला होता. लग्नाला चारच महिने झाले होते त्यातच तिच्या त्या गोड बातमीनं नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सध्या आलिया प्रेग्नंसीचा तो काळ आनंदात व्यतीत करत असली तरी येत्या काळात तिनं एक मोठा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. आलियाच्या घरी नवा पाहूणा येणार यासाठी आलियानं आतापासून मोठा निर्णय घेण्याची मानसिकता केली आहे.

आलिया लवकर आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिची बेबी बंप फोटोशुट व्हायरल झाले होते. यावेळी बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटी अभिनेत्री हजर होत्या. आलियाच्या परिवारातील निवडक सदस्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. आलिया ही लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती याबद्दल नेटकऱ्यांच्या मनात शंका नव्हती. त्यामुळे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल आता त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे स्वागत करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सगळ्यात आलियाचा तो निर्णय चाहत्यांची निराशा करणारा आहे.

आलिया काही काळ तिच्या पर्सनल लाईफपासून आणि बॉलीवूडच्या लाईमलाईटपासून लांब राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुलासाठी ती हा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. यासाठी आलिया किमान एक वर्षभर तरी कोणत्या प्रोजेक्टममध्ये दिसणार नसल्याचे चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes: मिचेल स्टार्कनं इतिहास घडवला; हॅरी ब्रुकची विकेट घेऊन वसिम अक्रमचा विक्रम मोडला, पाकिस्तानी दिग्गज म्हणाला...

Latest Marathi News Live Update : कृषी उत्पन्न बाजारपेठ उद्या एक दिवसासाठी बंद!

Video: क्रूरतेचं टोक! कृत्रिम पाय उचलून फेकला, अपंगाला अमानूष मारहाण; जीआरपी कॉन्स्टेबलने सगळ्या मर्यादा ओलांडल्या

'जुबान केसरी म्हण ना…' नवरीची विनंती! शाहरुख खानचा मजेशीर नकार! म्हणाला...'बॅन करतील..'

Dry Fruits Price : काजू-बदाम-अक्रोडचा भाव 'जैसे थे'; जीएसटीत कपात झाली, तरी सुकामेव्याच्या दरात यंदा ग्राहकांना दिलासा नाही

SCROLL FOR NEXT