Alia Bhatt mother Soni Razdan Compare Nepo Kids 
मनोरंजन

Alia Bhatt Mother : बॉलीवूडमधल्या घराणेशाहीवर आलियाच्या आईचं मोठं विधान, काय म्हणाल्या माहितीये?

बॉलीवूडमधील सेलिब्रेटी हे सेलिब्रेटी किड्सवर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बोलताना दिसतात.

युगंधर ताजणे

Alia Bhatt mother Soni Razdan Compare Nepo Kids : बॉलीवूडमधील सेलिब्रेटी हे सेलिब्रेटी किड्सवर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बोलताना दिसतात. सध्या प्रसिद्ध दिग्दर्शक झोया अख्तर यांच्या द आर्चिज नावाच्या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्यामध्ये किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान, अमिताभ बच्चन-जया बच्चन यांचा नातू अगस्त्य आणि बोनी कपूर यांची मुलगी खूशी कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सोशल मीडियावर या सेलिब्रेटी किड्सवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या आहेत. नेटकऱ्यांनी त्या सेलिब्रेटींच्या मुलांवर तोफ डागली आहे. त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. इतर कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी कित्येक वर्षांचा संघर्ष करावा लागतो. खूप वर्ष वाट वाट पाहावी लागते. या उलट सेलिब्रेटी किड्सला मिळणारी संधी त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.

सध्या प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान यांच्या प्रतिक्रियेनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांनी नेपोटिझमवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बॉलीवूडमधील सेलिब्रेटी आणि त्यांच्यातील नातेसंबंध यावरुन होणारा वाद याकडे लक्ष वेधले आहे. त्या व्हायरल झालेल्या एका पोस्टवरुन चर्चेला सुरुवात झाली आहे. स्टार किड्सवर किती मोठा दबाब असतो हे तुम्हाला माहिती आहे का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

फ्रेडी बर्डीनं इंस्टावर शेयर केलेल्या त्या पोस्टनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. त्यामध्ये त्या म्हणतात, जे लोक नेहमीच भाऊबंद मधील वादाचे कारण ठरतात त्यांना त्याचे फायदे तोटे चांगलेच माहिती असतात. मला एक सांगा मुलांना त्यांचे आई वडील जो व्यवसाय करतात तो नाकारण्याचा अधिकार आहे का, डेंटिस्टच्या मुलांना त्यांना त्याच प्रोफेशनमध्ये करिअर करावे असे वाटत असते.

मी देखील एक बाहेरची व्यक्ती होते. बॉलीवूडमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे तुम्ही जर येणाऱ्या संकटांना तोंड देण्यास सक्षम नसाल तर मग तुम्ही दुसरा एखादा व्यवसाय निवडा. जेणेकरुन तुम्हाला तुमचं आयुष्य वेगळ्या प्रकारे जगता येईल.

अनन्या, सुहाना, खुशी या सुपरस्टार्स आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मला काही वेगळ्या प्रकारे बोलायचे नाही. राजदान यांच्या त्या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्या असून त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT