Ayodhya Ram Temple consecration ceremony on January 22  Esakal
मनोरंजन

Ram Temple inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आलिया अन् रणबीरला खास निमंत्रण! आरएसएसकडून मिळाली पत्रिका

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.

Vaishali Patil

Ayodhya Ram Temple consecration ceremony on January 22: श्री रामजन्मभूमी मंदिराचा अभिषेक सोहळा 22 जानेवारीला अयोध्येत संपन्न होणार आहे. या खास सोहळ्याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीलाही वेग आला आहे. तर आता कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांनाही निमंत्रण पाठवण्यात येत आहे.

यात केवळ राजकिय आणि सामजिक क्षेत्रातीलच नाही मनोरंजन विश्वातील कलाकारांना देखील आमंत्रित करण्यात येत आहे. आता बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. आलिया आणि रणबीरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी निमंत्रण दिले आहे.

रजनीकांत, प्रभास, कंगना रणौत, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, सनी देओल, अजय देवगण, आयुष्मान खुराना, मधुर भांडारकर, संजय लीला भन्साळी या खास कलाकारांना अयोध्येत येण्याचे आमंत्रण मिळाले आहे. आता या यादीत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे नाव देखील जोडले गेले आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना या सोहळ्याचे खास आमंत्रण मिळाले आहे. सध्या आलिया अन् रणबीरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत दोघेही निमंत्रण पत्रिका हातात घेऊन हसताना दिसत आहेत.

आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, आरएसएस कोकणचे प्रांतीय प्रचार प्रमुख अजय मुडपे आणि निर्माता महावीर जैन यांनी आलिया आणि रणबीरला श्री रामजन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT