sushant ambulance attendant 
मनोरंजन

अँबुलन्स अटेंडंटचा खुलासा, सुशांतच्या मृतदेहाविषयी सांगतली 'ही' महत्वाची गोष्ट

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये दरररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुशांतचा मृतदेह आणणा-या अँबुलन्सच्या ड्रायवरनंतर आता त्याच्या अटेंडंटचा जबाब देखील समोर आला आहे. या अटेंडंटने हा देखील दावा केला आहे की पोलिसांच्या दबावामुळे तो सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. मात्र त्याने हे जरुर सांगितलं की जेव्हा पोलिसांच्या टीमसोबत तो सुशांतच्या रुममध्ये आला होता तेव्हा सुशांतची बॉडी कोणत्या अवस्थेत होती.

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अँबुलन्स अटेंडंटने सांगितलं की, त्याने याआधी देखील अनेक आत्महत्या केलेले मृतदेह पाहिले आहेत. मात्र सुशांतचा मृतदेह पिवळा पडला होता. या अटेंडंटने असाही दावा केला आहे की सुशांतच्या मृतदेहाचे केवळ पाय वाकलेले नव्हते तर त्याच्या पायावर निशाण देखील होते. अटेंडंटने सुशांतच्या गळ्याभोवती असलेल्या निशाणावर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. 

सुशांतच्या या केसमध्ये असं देखील म्हटलं जातंय की जेव्हा सुशांतने फाशी घेतली तेव्हा त्याचा बेड आणि त्याच्या पायामध्ये खूप कमी अंतर होतं. अशात जेव्हा त्याने फाशी लावली असेल तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाली असेल. यासोबतंच फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं की सुशांतच्या गळ्याभोवती जे निशाण आहे ते त्याच कपड्याचं होतं ज्याने त्याने फास लावला होता. या गोष्टीवर अनेकांनी त्यांची वेगवेगळी मतं मांडली आहेत.  

ambulance attendant claims sushant singh rajput body had turned yellow and both his legs were bent  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT