Amitabh Bachchan gifts bungalow worth Rs 50 crore to daughter Shweta Nanda SAKAL
मनोरंजन

Amitabh Bachchan: बिग बींनी स्वतःचा बंगला दिला मुलीला गिफ्ट, किती आहे किंमत?

बिग बींनी ही खास गोष्ट करुन एक नवीन आदर्श ठेवलाय

Devendra Jadhav

हल्लीच्या जमान्यात नातेवाईकांमध्ये प्रॉपर्टी आणि पैशावरुन वाद सुरु असतात. संपत्तीच्या वाटणीसाठी सख्खी भावंडं कोर्टाच्या पायऱ्या चढतात. अशातच बिग बी अमिताभ बच्चन यांनी नवा आदर्श सर्वांना घालुन दिलाय.

बिग बींनी स्वतःचा बंगला त्यांच्या मुलीला गिफ्ट केलाय. या बंगल्याची किंंमत प्रचंड महाग असल्याचं सांगितलं जातं. जाणून घ्या सविस्तर.

अमिताभ आणि जया बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेताला ही खास भेट दिली. जुहूजवळ असलेला प्रतीक्षा बंगला 674 स्क्वेअर मीटर आणि 890.47 स्क्वेअर मीटरच्या जागेत पसरला आहे. या बंगल्याची एकूण किंमत 50.63 कोटी रुपये आहे.

8 नोव्हेंबर रोजी हा व्यवहार करण्यात आलायय. यासाठी 50.65 लाख रुपये अतिरिक्त मुद्रांक शुल्क भरले गेले.

ही एक अतिशय हृदयस्पर्शी खास भेट असल्याचं सांगण्यात येतं. कारण अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब अनेक वर्षे प्रतिक्षामध्ये राहत आहे. अमिताभ कारकीर्दीची सुरुवातीची वर्ष सहकुटुंब प्रतीक्षामध्ये राहिले होते. अमिताभ यांची जुहू भागात प्रतीक्षाशिवाय जलसा आणि जनक ही दोन घरं आहेत.

श्वेता तिच्या वडिलांसोबत एक विशेष बंध शेअर करते. अमिताभ यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला श्वेताने एक हृदयस्पर्शी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यावेळी शेअर केलेल्या फोटोंंमध्ये श्वेता तिच्या वडिलांना घट्ट मिठी मारत आहे.

अमिताभ यांनीही लाडक्या लेकीला आजवर अनेकदा सपोर्ट केलाय. बच्चन कुटूंब अभिनयक्षेत्रात असलं तरीही श्वेताने वेगळी वाट निवडलीय. श्वेता एक लेखिका आहे. तिचे विविध विषयांवर लेख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : तानसा तलावात ९८.३७ टक्के पाणीसाठा, इतर तलावांमध्ये किती?

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

Alandi Spiritual Visit: आळंदीत चैतन्यमय वातावरण; संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेत बिट्टा यांचे गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT