Anant Radhika Pre Wedding news esakal
मनोरंजन

Anant Radhika grand pre-wedding : प्री वेडिंगलाच अडीच हजारांहून जास्त डिशेस तर लग्नात काय? 'मेन्यू' ची रंगतेय चर्चा!

अंबानींच्या लाडक्या लेकाचं (Anant Radhika grand pre-wedding ) म्हटल्यावर चर्चा तर होणारच... आता प्री वेडिंगमधील मेन्यूची बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानीचं अन् राधिका मर्चंटचं होणारं लग्न हे चर्चेत आलं आहे. या लग्नाला उपस्थित राहणारे मान्यवरांची यादी यापूर्वी समोर आली होती. आता प्री वेडिंगला येणाऱ्या पाहुण्या मंडळीसाठी कोणता खास मेन्यू असणार याची चर्चा रंगली आहे.

जगभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आहे. अशातच (Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding news) इंडिया टुडेनं व्हायरल केलेल्या एका पोस्टनुसार अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग मध्ये किती प्रकारचे मेन्यू असणार याविषयी वृत्त दिले आहे. ज्याची चर्चा होत आहे.

सध्या तरी अंबानी परिवाराकडून पाहुण्या मंडळींच्या भोजन व्यवस्थेविषयी विशेष लक्ष दिले जात आहे. भारतातल्या सर्वाधिक ग्रँड वेडिंगपैकी एक (Ambani Grand Pre Wedding News) म्हणून या सोहळ्याकडे पाहिले जात आहे. अशावेळी त्यातील प्रत्येक गोष्टीची चर्चा होताना दिसत आहे. अनंत आणि राधिकाचा प्री वेडिंग सेरेमनी हा येत्या १ ते ३ मार्च रोजी गुजरामधील जामनगर येथे पार पडणार आहे.

यावेळी या संपूर्ण इव्हेंटचे मॅनेजमेंट पाहणाऱ्या कमिटीकडून सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांनी पाहणी करत आणखी कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे याची तपासणी करुन घेतली आहे.

यापूर्वी अनंत अंबानी आणि राधिकाच्या प्री वेडिंगला जे सेलिब्रेटी हजर राहणार आहेत त्यांची यादी समोर आली होती. त्यात मेटाचे सीइओ मार्क झुकरबर्ग, टेड पिकचे सीईओ मॉर्गन स्टॅनली, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, डिझ्नेचे सीइओ बॉब आयगर, ब्लॅक रॉकचे सीइओ लॅरी फिंक, अॅडनॉकचे सीइओ सुलतान अहमद अल जबार, बँक ऑफ अमेरिकेचे चेअरमन ब्रायन थॉमस मोनियान, ब्लॅकस्टोनचे चेअरमन स्टिफन श्वार्झमन, कतार प्रीमिअर मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम अल थानी, अडोबचे सीईओ शंतनु नारायण यांचा समावेश होता.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर रिलायन्स फाउंडेशनच्यावतीनं एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्यात रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी दिसत होत्या. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत अनंत आणि राधिकाला शुभेच्छा दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT