Animal Box Office Collection Day 5:  Esakal
मनोरंजन

Animal Box Office Collection Day 5: 'अ‍ॅनिमल'चा बॉक्स ऑफिसवर हल्ला! जितकी टीका तितकं जास्त कलेक्शन!

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे.

Vaishali Patil

Animal Box Office Collection Day 5: सध्या मनोरंजन विश्वात फक्त अ‍ॅनिमलचीच चर्चा सुरु आहे. सोशल मिडिया असो किंवा मित्रांच्या गप्पा असो. सगळीकडे फक्त रणबीरच्या अ‍ॅनिमलचीच चर्चा सुरु आहे.

एकीकडे या चित्रपटावर कडाडून टीका होत आहे तर दुसरीकडे या सिनेमाची क्रेझ ही तितकीच आहे. या चित्रपटातील काही सीन्सवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तरी देखील चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे.

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. विकेंडनंतरही अ‍ॅनिमलच्या कमाईत कसलीच घट झालेली नाही. सोमवारी चित्रपटाने 'जवान' आणि 'गदर 2'चा रेकॉर्ड मोडला.

आता 'अ‍ॅनिमल'ला रिलीज होऊन पाच दिवस झाले आहे. तर रिलिजच्या पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी चित्रपटाने किती कोटींचे कलेक्शन केले यावर नजर टाकूया.

'अ‍ॅनिमल' हा सिनेमा 4 भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बजेट वसूल केलं होतं. बॉक्स ऑफिस ट्रॅकर Sacknilk च्या अहवालानुसार, चित्रपटाने 5 व्या दिवशी 38.25 कोटी रुपये कमावले.

या कमाईसोबतच भारतात चित्रपटाने एकून 283.74 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील चित्रपटाच्या कमाईचा आकडा 425 कोटीच्या पुढे गेला आहे.

पुन्हा 'अ‍ॅनिमल'ने रिलीजच्या पाचव्या दिवशी 280 कोटींहून अधिक करत पुन्हा रेकॉर्ड केला आहे. आता 'अ‍ॅनिमल' वीकेंडपर्यंत पुन्हा किती कोटींची कमाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या कमाईसोबत हा सिनेमा रणबीर, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: शिंदेंच्या दरे गावात फडणवीस उभारणार तणाव मुक्तीकेंद्र, बजेटमध्ये केली घोषणा; काय म्हणाले?

Free Health Services : मोफत उपचारांसाठी नागरिकांची गर्दी; कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर रुग्णांचा वाढता विश्वास

Kolhapur Black Spots : निम्मे शहर, ‘ब्लॅक स्पॉट’चा कहर; वाहनधारकांच्या जीवाशी खेळ, किरकोळ उपाय; जीव गेल्यानंतरच हालचाली

Viral Video : मॅडमचा शाळेत राजेशाही थाट ! शिकवायचं सोडून विद्यार्थिनींकडून वर्गातच करुन घेतला मसाज, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Farmer Loan: अटी-शर्तींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेतून बाहेर राहणार; राजू शेट्टींनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

SCROLL FOR NEXT