Animal Movie Ranbir Kapoor Rahsmika Mandana 
मनोरंजन

Animal Controversy : 'महिनाभरात चारवेळा पॅड....' अ‍ॅनिमल मधील 'त्या' डायलॉगवरुन नव्या वादाला सुरुवात, महिलावर्गात नाराजी

रणबीर कपूरच्या अॅनिलमनं एव्हाना सगळीकडे वेगवेगळ्या चर्चेला सुरुवात करुन दिली आहे.

युगंधर ताजणे

Animal Movie Ranbir Kapoor Rahsmika Mandana : रणबीर कपूरच्या अॅनिलमनं एव्हाना सगळीकडे वेगवेगळ्या चर्चेला सुरुवात करुन दिली आहे. हा चित्रपट भलेही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला असेल मात्र आता त्यावरुन वेगवेगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. खासकरुन महिला वर्गानं त्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

त्या चित्रपटामध्ये एक सीन आहे. ज्यात रणबीर कपूर हा रश्मिकाला म्हणतो की, महिन्यातून चारवेळा पॅड चेंज करताना किती नाटक करतेस तू. मी रोज ५० वेळा ते करतो आहे. त्या संवादावरुन सोशल मीडियावर मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे.

एकानं म्हटलं आहे की, त्या डायलॉगमधून उगाचच पीरियडसचा उल्लेख करण्याची गरज नव्हती. तसे केल्यानं दिग्दर्शक आणि कलाकार यांनी महिलांची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यांच्यावर टीका होत आहे. जर तुम्हालाच काही माहिती नाही तर असे संवाद चित्रपटात घेताच कशाला, असेही काहींनी म्हटले आहे.

महिलेला प्रत्येक महिन्याला तो त्रास होतो. पण त्यामुळे तिचा काही मृत्यू होत नाही. पण त्या चित्रपटातून काहीही सांगून दिशाभूल करण्याचा आणि वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे.काहींनी दिग्दर्शक रेड्डी आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यावर तीव्र शब्दांत आगपाखड केली आहे.

एका युझर्सनं म्हटलं आहे की, अॅनिमलच्या लेखकाला कुणी सांगा की महिन्यात नव्हे तर दिवसभरातून चारवेळा पॅड बदलले जातात. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, देवा हा किती मोठा अपमान आहे. लोकांना नेमकं काय आवडतं हेच आता कळेनासे झाले आहे, वांगानं डायपरला पॅड असे म्हटले आहे. त्यानं काय केलं आहे हेच त्याला माहिती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंडमध्ये मंत्र्याचं निधन, छातीतली कळ नॉर्मल समजून सहन करत राहिले, २ तासांनी तीव्रता वाढली अन्...

Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे

Nashik Accident: गोदाघाटावर थरार! गांधी तलावात पाच मुले बुडू लागली; चार जीवरक्षकांनी वाचविले चौघांचे प्राण, एकाचा मृत्यू

Manoj Jarange: ‘मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे स्वप्न पाहू नका’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, सलाइन-पाणीही बंद

Nepal Floods: माणुसकीचे दर्शन! कुटुंबाबरोबरच पूरग्रस्तांच्या शोधासाठी प्रयत्न; आप्त हरवले...तरीही इतरांसाठी धडपड

SCROLL FOR NEXT