animal movie shooting in saif ali khan pataudi palace  SAKAL
मनोरंजन

Animal: या अभिनेत्याच्या बंगल्यावर झालंय 'अ‍ॅनिमल' सिनेमाचं शूटींग, वाचून व्हाल थक्क!

'अ‍ॅनिमल' सिनेमा सध्या बॉक्स ऑफीसवर कोट्यावधींची कमाई करतोय

Devendra Jadhav

Animal Movie Updates News: रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'अ‍ॅनिमल' सिनेमावर बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. 'अ‍ॅनिमल' मात्र बॉक्स ऑफीसवर दिवसेंदिवस करोडोंची कमाई करत आहे.

अशातच 'अ‍ॅनिमल' विषयी एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 'अ‍ॅनिमल' सिनेमाचं बहुतांश शुटींग एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या बंगल्यावर झालं आहे.

या अभिनेत्याच्या बंगल्यावर झालं 'अ‍ॅनिमल'चं शुटींग

'अ‍ॅनिमल' सिनेमात रणबीर कपूर - अनिल कपूर यांचा आलिशान आणि भव्यदिव्य बंगला दिसतोय. हा बंगला दुसरा - तिसरा कोणी नसुन तो आहे पतौडी पॅलेस.

सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसवर 'अ‍ॅनिमल'चं शुटींग झालंय. याशिवाय परदेशात काही ठिकाणी 'अ‍ॅनिमल'चं शुटींग झालंय. यामध्ये इंग्लंड अणि स्कॉटलंड अशा ठिकाणांचा समावेश आहे.

(The shooting of 'Animal' took place at this actor's bungalow)

पतौडी पॅलेसबद्दल थोडंसं...

सैफ अली खानच्या वडिलोपार्जित पतौडी पॅलेसमध्ये 'अ‍ॅनिमल'चा मोठा भाग शूट करण्यात आला आहे. पतौडी पॅलेसची किंमत सुमारे 800 कोटी रुपये आहे. 'अ‍ॅनिमल' पाहताना तुम्हाला सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसचा मोठा भाग पाहता येईल.

पतौडी पॅलेस 1935 मध्ये बांधण्यात आला होता. सैफ अली खानच्या कुटुंबातील शेवटचे नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांनी बांधलेल्या या घराच्या आतील भागात भारतीय आणि इस्लामिक पद्धतीचं बांधकाम दिसतं.

'अ‍ॅनिमल' बद्दल थोडंसं...

रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासह अनेक कलाकारांनी 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

'अ‍ॅनिमल' चित्रपटाची कथा बाप आणि मुलाच्या प्रेमावर आधारित आहे. चित्रपटात खुपच अॅक्शन पहायला मिळते. तर चित्रपटातील रणबीरच्या वेगळ्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT