Annu Kapoor admitted to Delhi hospital for chest pain, stable and recovering  sakal
मनोरंजन

Annu Kapoor admitted: अभिनेते अन्नू कपूर रूग्णालयात.. प्रकृती बाबत मोठी अपडेट..

छातीत दुखू लागल्यानं अन्नू कपूर यांना दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नीलेश अडसूळ

Annu Kapoor Hospitalized: आपल्या आवाजाने आणि अभिनयाने बॉलीवुडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यानेत्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.

(Annu Kapoor admitted to Delhi hospital for chest pain, stable and recovering)

त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना डॉक्टर संजय स्वरूप म्हणाले की, अन्नू कपूर यांच्या छातीत दुखत होतं. परंतु त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही, ही कंजेशन होतं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती पूर्णतः स्थिर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीला सकाळी त्यांना अचानक छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्यांना तात्काळ दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अन्नू कपूर अभिनेतेच नाहीत उत्तम गायक आहेत. त्यांच्या आवाजाची जादू दाखवत त्यांनी अनेक शो होस्ट केले आहेत. संगीत आणि बॉलीवुडमधली गाणी यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांनी 100 हून अधिक चित्रपट केले असून राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार असे कित्येक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दादरमध्ये बेस्ट बसची अनेक गाड्यांना धडक, दोघांचा मृत्यू; १० ते १२ जण जखमी

Maharashtra Farmer Loan Waiver : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ; पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

Latest Marathi News Live Update : ठाणे मनपाच्या चौथ्या मजल्यावर आग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! सलग 10 व्या दिवशी दर घसरले; उच्चांकापासून 29,000 रुपयांनी स्वस्त, आज महाराष्ट्रात किती भाव?

Konkan Railway Recruitment : कोकण रेल्वेचा अजब कारभार! 132 पदांसाठी भरती कोकणात, पण मुलाखती चक्क आंध्र प्रदेशात; स्थानिक तरुणांमध्ये तीव्र संताप

SCROLL FOR NEXT