Anushka Sharma Cute Wish On Husband Virat Kohli 35th Birthday  Esakal
मनोरंजन

Virat Kohli Birthday: 'मी तुझ्यावर कायम प्रेम करेन...',अनुष्कानं 'पतीदेव' विराट कोहलीला दिल्या वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा

Vaishali Patil

Anushka Sharma Wish Husband Virat Kohli: भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या 35व्या वाढदिवशी विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. 2008 मध्ये भारतासाठी खेळून कारकिर्दीची सुरुवात करणारा कोहली आज तमाम चाहत्यांच्या मनावर राज्य करतो.

विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी आणि त्याच्या चाहत्यांनी विराटवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र विराटला त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने नेहमी प्रमाणे एका खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने विराट कोहलीची खिल्ली उडवली आहे. अनुष्का आणि विराटची बाँडिंग सर्वांनाच माहित आहे. अनुष्का विराटची मस्करी करण्याची एकही संधी सोडत नाही. आता अनुष्काने विराटचे काही फोटो शेयर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्काने विराट कोहलीचे काही फोटो पोस्ट करत लिहिले की, "तो आयुष्यातील प्रत्येक भूमिकेत उत्कृष्ट आहे! तसेच, तो त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत नवनवीन यशाची शिखरं गाठत आहे. मी तुझ्यावर नेहमी, या जीवनात आणि प्रत्येक क्षणी, काहीही झाले तरी असेच प्रेम करेल."

विषेश म्हणजे या पोस्टमध्ये अनुष्काने 2011 सालातील एक बातमी शेअर केली आहे. यावेळी विराटने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिरो बॉलवर विकेट घेण्याचा विक्रम केला होता. विराट कोहली हा जगातील एकमेव असा गोलंदाज ठरला ज्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैध चेंडू टाकण्यापूर्वीच खेळाडूला बाद केले होते.

यावर विराटनेही इमोजी कमेंट केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या पोस्टला कमेंट करत विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत तर अनुष्काच्या फोटोंचे कौतुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०२६

Video: अंपायरने नॉट आऊट दिलं, पण कर्णधार वैभव सूर्यवंशीचा मास्टरस्ट्रोक! शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाने मिळाली विकेट

Jat Wildlife Attack : सांगलीत धक्कादायक घटना! जतमधील अंकले येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 75 वर्षीय पोलिस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू, शेळ्या चारण्यासाठी गेले अन्...

Marathi News Live Updates : कोल्हापूर शहरात आज आणि उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, काय आहे कारण?

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

SCROLL FOR NEXT