Anushka Sharma and Aditya Chopra  Sakal
मनोरंजन

Anushka Sharma: अनुष्काचा मोठा खुलासा! आदित्य चोप्राने अनुष्काला तिच्या कुटुंबाला ‘ती’ गोष्ट सांगण्यापासूनही रोखलं

अभिनेत्री अनुष्का शर्माने आदित्य चोप्रा आणि तिचा पहिला चित्रपट रब ने बना दी जोडीबद्दल अनेक मजेदार गोष्टी शेअर केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'द रोमॅंटिक्स' या माहितीपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या माहितीपटात किंग ऑफ रोमान्स म्हटल्या जाणाऱ्या यश चोप्राचा सुंदर प्रवास दाखवण्यात आला आहे.

स्मृती मुंद्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनवलेल्या या माहितीपटात चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांच्यासोबत काम करतानाचे त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. आता अभिनेत्री अनुष्का शर्माने आदित्य चोप्रा आणि तिचा पहिला चित्रपट रब ने बना दी जोडीबद्दल अनेक मजेदार गोष्टी शेअर केल्या आहेत.

यशराज फिल्म्सने प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माला पहिला ब्रेक दिला. 2008 मध्ये अनुष्का शर्माचा ब्लॉकबस्टर डेब्यू चित्रपट 'रब ने बना दी जोडी' आला होता. अनुष्काला यशराज फिल्म्सनेच लॉन्च केले होते. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अनुष्का मुख्य भूमिकेत होती. आता अनुष्का शर्माने चित्रपटाशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

अनुष्काने सांगितले की, 'आदित्यला चित्रपटातील त्याचे काम गुप्त ठेवायचे होते. हे मी माझ्या आई-वडिलांना सांगू नये अशी त्यांची इच्छा होती. YRF च्या कर्मचार्‍यांनाही माहिती नव्हती की मी चित्रपटात मुख्य भूमिका करत आहे.

अनुष्काने सांगितले की, 'सर्व काही गुप्त होते. याबद्दल कोणालाच माहिती नव्हती आणि मी मुख्य अभिनेत्री आहे हे कोणालाही कळू नये असे आदित्यला वाटत नव्हते. आदित्य अक्षरशः मला म्हणाला, 'तू कोणाला सांगू शकत नाहीस. तू तुझ्या आई-वडिलांनाही सांगू शकत नाहीस.' मी म्हणाले, 'मी असं नाही करू शकत कारण मी त्यांच्यासोबत राहते.'

'द रोमँटिक्‍स'बद्दल बोलताना चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा 'रब ने बना दी जोडी'बद्दलही बरेच काही बोलले. या चित्रपटाने यशराज फिल्म्सला मोठ्या अपयशातून वाचवले. आदित्य चोप्रा यांनी खुलासा केला, 'मला अशा वेळी वाटले की कंपनीला एक मोठा हिट चित्रपट देण्याची गरज आहे आणि मला ते करावे लागेल' जेव्हा रब ने बना दी जोडी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता.

तेव्हा अनेकांनी मला 26/11 मुंबई ताज हल्ल्याने मला चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवण्यास सांगितले होते, पण मी आधीच ठरलेल्या तारखेला चित्रपट प्रदर्शित केला. अशाप्रकारे 2008 साली आलेला अनुष्का शर्मा आणि शाहरुख खानचा 'रब ने बना दी जोडी साल' हा चित्रपट सुपरहिट ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT