Arjun Kapoor Malaika Arora relationships  esakal
मनोरंजन

Arjun Kapoor Malaika : 'मलायकाला विचारात न घेता जर...', अर्जून काय बोलून गेला?

प्रसिद्ध अभिनेता अर्जून कपूर आणि मलायका यांच्या नात्याविषयी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बोलले जाते.

युगंधर ताजणे

Arjun Kapoor Malaika : प्रसिद्ध अभिनेता अर्जून कपूर आणि मलायका यांच्या नात्याविषयी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे बोलले जाते. त्यांच्या लग्नाबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. करण जोहरच्या शो मध्ये अर्जून पुन्हा एकदा सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला त्याच्या रिलेशनशिपविषयी आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यानं दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे.

करणच्या शो मध्ये अर्जून काय बोलला....

कॉफी विथ करण शो मध्ये अर्जून आल्यानंतर त्याला करणनं वेगवेगळे प्रश्न विचारुन बोलते केले. मलायकाच्या त्या प्रश्नावर अर्जून म्हणाला की, मला नात्यावर विशेष काही टिप्पणी करायची नाही. तिच्या भविष्याचा निर्णय मी कसा काय घेणार, त्यावर मी एकटा कसा काय बोलेन, जेव्हा आम्ही कोणत्या एका ठाम निर्णयाचा विचार करु तेव्हा सांगेन. आता सध्या ज्या परिस्थितीत आहे त्याविषयी आनंदी आहे.

कायमच ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं...

बऱ्याचवेळेला अर्जूनला मलायकासोबतच्या नात्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी त्याच्यावर चाहते आणि नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करुन त्याला हैराण केले होते. त्यावर अर्जूननं ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. लोकांना बोलणं फार सोपं वाटतं. आपण जेव्हा कुण्या एखाद्या सेलिब्रेटीविषयी बोलतो तेव्हा त्याचा त्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम किती गंभीर असू शकतो हे लक्षात घेत नाही.

ट्रोलिंगवर बोलताना अर्जून म्हणतो की, मला जेव्हा लोकं टीका करतात तेव्हा त्याचे फारसे काही वाटेनासे झाले आहे. शेवटी मी त्यांना कितीवेळा त्याच त्याच गोष्टींविषयी सांगणार. त्यांच्या बोलण्यातून ते कोणत्या परिवेशातून आले आहे याच्याविषयी कळते. एक मात्र खरं की त्या प्रतिक्रियांचा धाडसानं सामना करावा लागतो. माझा जो काही निर्णय असेल तो मलायका आणि तिचं भविष्य यांना विचारात घेऊन असेल. त्यासाठी तिचं मत आवश्यक आहे.

टीका करणाऱ्यांना फक्त अमूक एखाद्या गोष्टींवर बाकीच्यांचे लक्ष कसे वेधले जाईल याविषयी उत्सुकता असते. लोकं माझंही लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात. पण मी दरवेळी त्याच विषयावर प्रतिक्रिया देण्यास टाळतो. नेटकरी जे काही बोलतात त्याचा आमच्यावर परिणाम होतो. असेही अर्जूननं यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमध्ये लवकरच मोठा फेरबदल, धर्मेंद्र प्रधान यांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री? कोणत्या मंत्र्याला मिळणार डच्चू?

Raju Navghare: आमदार राजू नवघरे नाशिक-अहिल्यानगर दौऱ्यावर; विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांचा घेणार आढावा

Phulambri Medical Waste: सार्वजनिक ठिकाणी सिरिंज, इंजेक्शनच्या बाटल्या; फुलंब्रीतील शिवमनगरी परिसरातील नागरिकांच्या जिवाशी खेळ

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा सुनेत्रा पवारांसह उद्धव ठाकरेंना धक्का; राष्ट्रवादी नगरसेवकांसह ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसेनेत

IPO News: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल! Shiprocket अन् Behari Lal Engineering ची बंपर लिस्टिंग; कुणाला सर्वाधिक रिटर्न?

SCROLL FOR NEXT