Kapoor Family 
मनोरंजन

सावत्र आई असली म्हणून काय झालं? अर्जुन झाला भावूक

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरचे (Arjun Kapoor) त्याची बहीण अंशुला कपूरसोबत (Anshula Kapoor) खूप प्रेमळ नाते आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, अभिनेत्याने त्याच्या सावत्र बहिणी जान्हवी (Janhnvi Kapoor) आणि खुशी (Khushi Kapoor) यांच्याशीही जवळीक साधली आहे. त्यांच्या सावत्र आई श्रीदेवी (Sridevi) यांच्या निधनानंतर त्याचे वडील बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्यासोबतचे नातेही दृढ झाले आहे.

Kapoor Family

याबद्दल बोलताना अर्जुनने एका न्यूज पोर्टलला सांगितले की, तो अजूनही जान्हवी आणि खुशीसोबतच्या त्याच्या नवीन बॉण्डचा शोध घेत आहे. तो म्हणतो, दोघींसोबतही बॉण्ड वाढला नाही कारण त्यांनी कधी एकत्र जास्त वेळ घालवलाच नाहिये. आता ते नाते तो शोधू शकतो.

अंशुलासोबतच्या त्याच्या बॉण्डबद्दल बोलताना, अभिनेत्याने कबूल केले की त्याच्या खऱ्या बहिणीशी त्याचे कनेक्शन "ओव्हरलॅपिंग" (overlapping) आहे. आणि ते कबूल करतात की ते भावनिकदृष्ट्या दोघेही सारखेच आहेत. "आम्हाला आमच्या आईने सारख्याच पद्धतीने वाढवले आहे, त्यामुळे आम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत." त्याने सांगितले.

Kapoor Family

‘2 स्टेट्स’ (2 States) अभिनेत्याने पुढे सांगितले की तो त्याच्या स्टुपिड जोक्सनी त्याच्या बहिणींना त्रास देत असतो. तो पुढे म्हणाला की ‘आपण एक सुखी कुटुंब आहोत ही खोटी धारणा निर्माण करणे आणि प्रत्येक गोष्टीवर चर्चा करणे’ हे त्याला आवडत नाही. त्याने हे देखील स्पष्ट केले की त्यांनी बर्‍याच गोष्टींवर चर्चा केली आहे, आणि ते पुढेही करत राहतील, पण तरीही अजून त्यांच्यासाठी इतके उघडपणे बोलणे ही एक अतिशय जिव्हाळ्याची गोष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT