Armaan Kohli  
मनोरंजन

अरमान कोहली प्रकरणात NCB ची पाच ठिकाणी छापेमारी

कार्तिक पुजारी

NCB ने अरमान कोहली Armaan Kohli प्रकरणात 5 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. तसेच याप्रकरणी 2 विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे

मुंबई- NCB ने अरमान कोहली Armaan Kohli प्रकरणात 5 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. तसेच याप्रकरणी 2 विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अरमान कोहली याच्या अडचणीत वाढ होणार असल्याची चिन्ह आहेत. अभिनेता अरमान कोहलीला 1 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आलीये. अरमानच्या घरी NCB ने छापा मारून शनिवारी त्याला अटक केली होती. (Maharashtra Latest News)

अरमान कोहलीच्या घरी अमली पदार्थ आढळून आले आहेत. एनसीबीने त्याच्या घरातून कोकेन हा अमली पदार्थ हस्तगत केला. दक्षिण अमेरिकेतून कोकेनची तस्करी करण्यात आल्याचे एनसीबीच्या आढळलंय. या प्रकरणात दोन विदेशी नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी एनसीबीने शुक्रवारी अभिनेता गौरव दीक्षितला अटक केली होती.

बॉलिवूडच्या ए-ग्रेड कलाकारांशिवाय टीव्ही कलाकारांवरदेखील पोलिसांनी नजर ठेवण्यास सुरुवात केलीये. ड्रग्ज प्रकरणात अनेकांना अटक होताना दिसत आहे. NCB याप्रकरणातील आरोपींचा कसून तपास करत आहे. NCB ने याआधी एजाज खान याचीही चौकशी आणि नंतर अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान अनेकांची नावं समोर आल्याचं सांगितलं जातंय. एजाजच्या चौकशीत अभिनेता गौरव दीक्षितचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबीने गौरवच्या घरावर छापेमारी केली.

ड्रग पेडलर शादाब बटाटा याला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान अभिनेता एजाज खानचं नाव समोर आलं होतं. शादाब हा मुंबईतील सर्वांत मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा आहे. चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे विविध ड्रग्ज उपलब्ध करून देण्यासाठी शादाब प्रसिद्ध होता. त्याच्या चौकशीतून अभिनेता एजाजचं नाव पुढे आलं होतं. एप्रिल महिन्यात मुंबई विमानतळावरून एजाजला एनसीबी पथकाने ताब्यात घेतलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, Test: भारताच्या Playing XI मध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोणाला खेळवणार? गौतम गंभीरने दिले संकेत; म्हणाला, 'त्याला संधी...'

Sahara Desert Tragedy : सहारा वाळवंटात अचानक ट्रक बंद पडला अन् पाण्याअभावी ४९ जणांचा तडफडून मृत्यू, २ जण कसे वाचले?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या नगरसेवकावर अत्याचाराचा गुन्हा

Nagpur NEET Aspirant : नागपूरच्या विद्यार्थिनीबाबत राहुल गांधींची पोस्ट; 19 वर्षीय स्नेहाच्या सुसाइड नोटमुळे देशभरात उडाली खळबळ, का संपवलं आयुष्य?

SC Reservation Controversy : महाराष्ट्रात पुन्हा 'रिडल्स' आंदोलनासारखा भडका उडणार? SC आरक्षण उपवर्गीकरणावरून माजी आमदाराचा थेट इशारा, 'भीम आर्मी'ही मंत्रालयात

SCROLL FOR NEXT