aishwarya rane 
मनोरंजन

मराठी अभिनेत्रीची आर्थिक मदतीसाठी वणवण; सिद्धिविनायक मंदिराबाहेर करतायत याचना

स्वाती वेमूल

'धूमधडाका' या चित्रपटात अशोक सराफ यांच्या नायिकेचे काम करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांची आर्थिक मदतीसाठी वणवण सुरू आहे. औषधोपचार आणि दैनंदिन खर्च भागावा यासाठी त्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर निधी जमा करत आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत सहकलाकार म्हणून काम केलेल्या ऐश्वर्या राणे या आता ओळखताही येणार नाहीत अशा अवस्थेत आहेत. राज्य शासनाकडे वारंवार मदत मागण्याची माझी इच्छा नाही, पण त्यांनी माझी अवस्था पाहून मदत करणे आवश्यक आहे, असं त्या म्हणाल्या. 'लोकमत'ने दिलेल्या वृत्तानुसार, त्या पुढे मुंबादेवी, महालक्ष्मी, शिर्डी, बाबुलनाथ अशा विविध मंदिरांबाहेर जाऊन आर्थिक मदत जमा करणार आहेत. 

लॉकडाउनच्या काळात रामदास आठवलेंनी दिला आसरा
ऐश्वर्या या सिंधुदुर्गमधील त्यांच्या गावच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र लॉकडाउनमुळे पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. या प्रवासात त्यांचे कपडे आणि इतर सामानही चोरीला गेले होते. त्यावेळी रामदास आठवलेंनी ऐश्वर्या यांना त्यांच्या घरात आसरा दिला होता. 

अपघातामुळे सिनेसृष्टीपासून दुरावल्या
'मर्द' या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या यांचा अपघात झाला होता. घोडेस्वारी करताना त्या पडल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्या पाठीच्या कण्याला जबरदस्त दुखापत झाली होती. त्यानंतर त्या उपचारासाठी परदेशीही गेल्या होत्या. मात्र उपचाराचा खर्च त्यांना पुढे परवडेनासा झाला. ऐश्वर्या यांचं घर, दागिने, थोडेफार जमा केलेले पैसे उपचारासाठीच गेले. तेव्हापासून त्या सिनेसृष्टीपासून दुरावल्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT