#AskSRK Does Shah Rukh himself answer the questions or his team? SAKAL
मनोरंजन

#AskSRK च्या प्रश्नांना शाहरुख स्वतःच उत्तरं देतो की त्याची टीम? किंग खाननेच केला आश्चर्यकारक खुलासा

शाहरुखने #AskSRK बद्दल आश्चर्यकारक खुलासा केला

Devendra Jadhav

Shah Rukh Khan #AskSRK News: शाहरुख खान हा बॉलिवुडचा बादशाह. आजवर विविध सिनेमांंमधून शाहरुखने त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली. शाहरुखच्या अभिनयाचे लाखो, करोडो चाहते आहेत.

शाहरुखने अनेकदा त्याच्या सिनेमांच्या निमित्ताने त्याच्या फॅन्ससोबत #AskSRK हे प्रश्न - उत्तरांचं सेशन करत असतो. फॅन्सनी विचारलेल्या प्रश्नांवर शाहरुख स्वतःच उत्तरं देतो का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता स्वतः शाहरुखनेच याचं उत्तर दिलंय.

(#AskSRK Does Shah Rukh himself answer the questions or his team?)

अलीकडेच, बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने त्याचा 58 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी स्टार्ससाठी पार्टी आयोजित केली होती. त्याशिवाय, तो एका कार्यक्रमातही गेला होता, जिथे त्याने चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा केला.

त्यादरम्यान, शाहरुख फक्त त्याचा आगामी चित्रपट डंकीबद्दलच बोलला नाही, त्याशिवाय त्याने चाहत्यांच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

याच इव्हेंटला शाहरुखने सांगितले की, #AskSRK च्या वेळीतो स्वतः प्रश्नांची उत्तरे देतो की त्याची टीम त्यांना उत्तरे देते का?

या कार्यक्रमादरम्यानचा शाहरुख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो आहे की, "खरं तर मी खूप लाजाळू आहे, त्यामुळे मी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही. बरेच लोक मला विचारतात की माझी टीम ASK SRK मध्ये प्रश्नांची उत्तरे देते का? पण नाही. सगळी उत्तरं मी देतो."

अशाप्रकारे #AskSRK च्या वेळी शाहरुख स्वतःच सर्व प्रश्नांची उत्तरं देतो, यावर शिक्कामोर्तब झालाय.

शाहरुख सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वतःचं देतो पण...

शाहरुख खान पुढे सांगतो की, जेव्हा एखाद्या चित्रपटाबद्दल काहीतरी लिहायचे असते तेव्हा तो त्याच्या टीमची मदत घेतो आणि त्यांना लिहायला सांगतो.

पण जेव्हा काही वैयक्तिक असते तेव्हा तो स्वतः लिहितो. शाहरुख खान बऱ्याच महिन्यांपासुन #AskSRK सेशन करत आहे. पठाण असो की जवान, शाहरुखने प्रश्नोत्तरांच्या सत्रातूनच त्याच्या दोन्ही चित्रपटांचे प्रमोशन केले. आता आगामी डंकीच्या वेळी सुद्धा शाहरुख पुन्हा एकदा #AskSRK च्या माध्यमातुन सक्रीय होईल यात शंका नाहीय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

बाबो! १४ वर्षांचं भांडण मिटलं, भाचा कृष्णा अभिषेक आणि सुनिता आहुजाचे रियुनियन, Viral Video

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये महिलांची बाईक रॅली

Diabetes Breath Analyzer : आता इंजेक्शनला बाय-बाय! ब्रीथ टेस्टनेच होणार डायबिटीस तपासणी; तज्ज्ञांचा नवा शोध, रुग्णांना मोठा दिलासा

Who is Malad Fake Baba? मुंबईत भोंदूबाबाचा अघोरी प्रताप! अंगात देवी येते सांगून काढायचा 'भूत'; साहित्याची यादी पाहून तुम्हीही हादरून जाल

SCROLL FOR NEXT