atlee new movie with shah rukh khan and thalapathy vijay announcement  SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan - Atlee: 'जवान'नंतर अ‍ॅटलीचा शाहरुखसोबत नवीन सिनेमा, सोबत दिसणार हा साऊथ सुपरस्टार

अ‍ॅटलीने शाहरुखसोबत नवीन सिनेमाची घोषणा केलीय. यावेळी शाहरुखसोबत साऊथचा सुपरस्टारसुद्धा झळकणार आहे.

Devendra Jadhav

Atlee New Movie With Shah Rukh Khan: अ‍ॅटली दिग्दर्शित शाहरुखचा जवान सिनेमा बॉक्स ऑफीसवर सुपरहिट झाला. जवानने १००० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला.

जवाननंतर अ‍ॅटलीने शाहरुखसोबत नवीन सिनेमाची घोषणा केलीय. त्यामुळे सर्वांना आनंद झालाय. विशेष म्हणजे, या सिनेमात शाहरुखसोबत साऊथचा मोठा सुपरस्टार झळकणार आहे. वाचा सविस्तर.

शाहरुख - अ‍ॅटलीचा नवीन सिनेमा, जोडीला हा साऊथ सुपरस्टार

अ‍ॅटलीने शाहरुखसोबत नवीन सिनेमाची घोषणा केलीय. यावेळी शाहरुख खानसोबत साऊथचा बडा सुपरस्टार झळकणार आहे. तो म्हणजे थलापती विजय.

'जवान' रिलीज होण्यापूर्वी विजय शाहरुख खानच्या चित्रपटात कॅमिओ करणार असल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. पण तसं काही घडताना दिसलं नाही. आता 'जवान' रिलीज झाल्यानंतर शाहरुख - विजय हे दोन्ही सुपरस्टार अ‍ॅटली दिग्दर्शित चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा आहे. खुद्द अ‍ॅटलीनेच याविषयी पुष्टी केली आहे आहे.

अलीकडेच एका मुलाखतीत अ‍ॅटली म्हणाला, 'जिंदा बंदा'चे शूटिंग झाले तेव्हा मी शाहरुख आणि विजयच्या उपस्थितीत माझा वाढदिवसही साजरा केला होता. मी विजय अण्णांना फोन केला आणि माझ्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित केले. त्यावेळी शाहरुख - विजय यांची आपापसात चर्चा झाली. आणि त्या चर्चेत त्यांनी मलाही सामिल करुन घेतले.

अ‍ॅटली पुढे म्हणाला, 'शाहरुख सरांनी मला सांगितले की, जर मी दोन सुपरस्टारसह चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार केला तर ते दोघेही त्यासाठी तयार आहेत. विजय अण्णांनीही "अमा पा' म्हटले. त्यामुळे मी आगामी सिनेमावर काम करत आहे. त्यामुळे विजय - शाहरुखला घेऊन माझा पुढचा चित्रपट असू शकतो.'

अशाप्रकारे अ‍ॅटलीच्या पुढच्या सिनेमात शाहरुख - विजय एकत्र आले तर भारतीय मनोरंजन विश्वातील तमाम लोकांसाठी ही पर्वणी असेल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT