Ram Lalla Pran Pratishtha esakal
मनोरंजन

Ram Mandir Inauguration : प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी नो शुटींग, 'ओन्ली जय श्रीराम'! बॉलीवूडमध्ये सुट्टी जाहीर

अयोध्येतील प्रभु श्रीराम यांच्या (Ram Mandir Inauguration) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे.

युगंधर ताजणे

Ram Lalla Pran Pratishtha : अयोध्येतील प्रभु श्रीराम यांच्या (Ram Mandir Inauguration) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. ती आता अंतिम टप्प्यात आली असून त्यात सहभागी होण्यासाठी अनेक (Latest entertainment news) राज्यांनी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना देखील अर्ध्या सुट्टी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

अशातच देशातील मनोरंजनाचे महत्वाचे केंद्र असलेल्या बॉलीवूडला ( Bollywood Latest news) देखील त्या दिवशी सुट्टी देण्यात आल्याची माहिती आहे. ज्या दिवशी अयोध्येत प्रभु श्रीराम यांच्या मंदिराचा भव्य उद्घघाटन सोहळा पार पडणार आहे त्यादिवशी म्हणजे २२ जानेवारील बॉलीवूडमध्ये कोणत्याही प्रकारचे शुटींग होणार नाही. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. जनसत्तानं याबाबत अधिक माहिती देणारे वृत्त दिले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील नागरिक त्या ऐतिहासिक दिवसांची वाट पाहत आहेत. उद्या (२२ जानेवारी) अयोध्येत मोठा सोहळा पार पडणार असून त्याला देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय, सामाजिक, मनोरंजन, क्षेत्रातील सेलिब्रेटी त्या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉज (FWICE) च्या वतीनं एक दिवसाच्या सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. २२ जानेवारीच्या दिवशी बॉलीवूडमधील सर्व काम बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. एफआयड्ब्ल्यूसीइचे अध्यक्ष बी एन तिवारी यांनी यावेळी या माहितीला दुजोरा दिला आहे.

अयोध्या मंदिराच्या उद्घघाटनासाठी बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींना निमंत्रण मिळाले आहे. त्यामध्ये साऊथ इंडस्ट्रीतल अनेक कलाकारांचाही समावेश आहे. महानायक बिग बी अमिताभ बच्चन, थलायवा रजनीकांत, अनुपम खेर, अजय देवगण, कंगना रनौत, रणबीर कपूर, रणवीर सिंह, आलिया भट्ट, सनी देओल, हेमा मालिनी, मधूर भांडारकर, यश, प्रभास, चिरंजीवी यांच्या नावाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT