Baby bring it on esakal
मनोरंजन

Baby Bring It On Song: "चांगल्या गाण्याची वाट लावली"; 'जाऊ द्या ना बाळासाहेब' मधील बेबी ब्रिंग इट ऑनचं हिंदी व्हर्जन ऐकून नेटकरी संतापले!

Baby bring it on: बेबी ब्रिंग इट ऑन या गाण्याचे हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पण या हिंदी व्हर्जनला काही नेटकरी ट्रोल करत आहेत.

priyanka kulkarni

Baby bring it on: 'जाऊ द्या ना बाळासाहेब' (Jaundya Na Balasaheb) हा गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) यांचा चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला. या सिनेमातील सर्वच गाणी प्रेक्षकांना आवडली. डॉल्बी वाल्या, वाट दिसू दे, बेबी ब्रिंग इट ऑन या 'जाऊ द्या ना बाळासाहेब' या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. यामधील डॉल्बी वाल्या आणि ब्रिंग इट ऑन ही दोन गाणी तर प्रत्येक कार्यक्रमात लावली जातात. आता यामधील बेबी ब्रिंग इट ऑन या गाण्याचे हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पण या हिंदी व्हर्जनला काही नेटकरी ट्रोल करत आहेत.

'बेबी ब्रिंग इट ऑन' चं हिंदी व्हर्जन झालं रिलीज

'बेबी ब्रिंग इट ऑन' या गाण्याचे हिंदी व्हर्जन हे मडगाव एक्सप्रेस या सिनेमात वापरण्यात आलं आहे. मडगाव एक्सप्रेस हा सिनेमा 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच यामधील 'बेबी ब्रिंग इट ऑन' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे, तर यामध्ये नोरा फतेही, दिव्येंदु, अविनाश यांनी डान्स केला आहे. तसेच मराठी अभिनेता उपेंद्र लिमये आणि अभिनेत्री छाया कदम यांची झलक देखील गाण्यात दिसते.

गाण्याला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'बेबी ब्रिंग इट ऑन' या गाण्याच्या हिंदी व्हर्जनला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं गाण्याला कमेंट केली, "चांगल्या गाण्याची वाट लावली" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "कायपण म्हणा मराठी गाण्याची सर या गाण्याला नाही"

'बेबी ब्रिंग इट ऑन' या गाण्याला देखील अजय-अतुल यांनीच संगीत दिलं होतं. तसेच या गाण्यात सई ताम्हणकर, गिरीश कुलकर्णी, भाऊ कदम हे कलाकार दिसले. हे गाणे अजय-अतुल यांनी लिहिलं होतं, तर या गाण्याच्या हिंदी व्हर्जनचे गीतकार कुमार हे आहेत.

'मडगाव एक्सप्रेस' ची स्टार कास्ट

मडगाव एक्सप्रेस या चित्रपटात दिव्येंदू, प्रतीक गांधी, अविनाश तिवारी, नोरा फतेही, उपेंद्र लिमये आणि छाया कदम या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन कुणाल खेमूनं केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...

Latest Marathi News Live Update : नितीश कुमार हे काही महिन्यांसाठीच मुख्यमंत्री होतील हे मी आधीच सांगितले होते- संजय राऊत

Pune Property Prices : पुणेकरांना धक्का ! घरे होणार महाग, शहर आणि ग्रामीण भागातील रेडीरेकनर दरात तब्बल 'इतक्या' टक्क्यांची वाढ ?

Post Holi Detox: होळीनंतर शरीर डिटॉक्ससाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

SCROLL FOR NEXT