Bade Miyan Chote Miyan Teaser starring akshay kumar tiger shroff manushi chhillar  SAKAL
मनोरंजन

Bade Miyan Chote Miyan Teaser: 'बडे मिया, छोटे मिया'चा ॲक्शनपॅक टिझर, हा साऊथ स्टार साकारणार खलनायक

Bade Miyan Chote Miyan Teaser starring akshay kumar tiger shroff manushi chhillar : अक्षय कुमार - टायगर श्रॉफ यांचा 'बडे मिया छोटे मिया'चा टिझर भेटीला आलाय.

Devendra Jadhav

Bade Miyan Chote Miyan Teaser: अक्षय कुमार - टायगर श्रॉफच्या आगामी 'बडे मिया छोटे मिया'चा टिझर भेटीला आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून 'बडे मिया छोटे मिया' सिनेमाची उत्सुकता होती. अखेर 'बडे मिया छोटे मिया'चा टिझर लोकांच्या भेटीला आलाय. या टिझरमध्ये अक्षय कुमार - टायगर श्रॉफ यांचा ॲक्शनपॅक अंदाज पाहायला मिळतोय.

मुंबई, लंडन, अबू धाबी, स्कॉटलंड आणि जॉर्डन सारख्या आश्चर्यकारक लोकेशन्सवर चित्रित केलेला 'बडे मिया छोटे मिया' हा भारतीय चित्रपट सिनेमॅटिक व्हिज्युअलसाठी लोकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे.

या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन हा खलनायकी भूमिकेत आहेत. याशिवाय सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

'बडे मिया छोटे मिया'चा टिझर चित्रपटाबद्दल खूप काही सांगतो. पण अजून अनेक गोष्टी येणे बाकी आहे. कारण चित्रपटात दमदार दृश्ये, आकर्षक गाणी, उत्कृष्ट प्रसंगांची पर्वणी मिळणार आहे. टायगर - अक्षयचा हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे.

वासू भगनानी आणि पूजा एन्टरटेन्मेंट एएझेड चित्रपटांच्या संयुक्त विद्यमाने बडे मियाँ छोटे मियाँची निर्मिती होत आहे.

अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित आणि वासू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा, अली अब्बास जफर यांनी निर्मिती केली आहे. हा सिनेमा ईदच्या दिवशी एप्रिल २०२४ रोजी सर्व रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT