Baipan Bhaari Deva:  Esakal
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: "मराठी कार्यक्रमात हिंदी कलाकारांचे प्रमोशन पण..." दिग्दर्शक केदार शिंदेंनी सांगितली मनातली खंत

Vaishali Patil

जसं बॉलिवूडमध्ये सनी देओलचा गदर2 आणि अक्षय कुमारचा OMG2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे तसचं मराठी मनोरंजन विश्वात एक सिनेमा धुमाकूळ घालत आहेत. त्याचं नाव म्हणजे 'बाईपण भारी देवा'. या चित्रपटाच्या यशाचं कारण ठरलं ते चित्रपटाची हलकी फुलकी स्टोरी आणि चित्रपटाला मिळालेली माऊथ पब्लिसिटी.

बाईपण भारी देवा चित्रपट रिलीज बॉक्स ऑफिसवर इतका धुमाकूळ घालेल असं चित्रपटाचे निर्माते आणि केदार शिंदे यांना देखील वाटलं नसावं.

चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक केदार शिंदे आणि चित्रपटातील कलाकारांची टीम बरेच कार्यक्रम आणि पार्टीमध्ये हजेरी लावताना दिसत आहे. आता बाईपण भारी देवाच्या टीमने सोनी वाहिनीवरील 'इंडिया बेस्ट डान्सर'च्या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये जात त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढली.

दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. ज्याच्या कॅप्शन त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आणि पुन्हा प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ते लिहितात की, "काल सोनी टिव्हीच्या 'इंडिया बेस्ट डान्सर 5' या कार्यक्रमात 'बाईपण भारी देवा' टीमला खास निमंत्रित केलं होतं. फारच अभिमान वाटतो. मराठी सिनेमा जेव्हा त्यांच्या व्यासपिठावर जावून आपला डंका वाजवतो तेव्हा ऊर भरून येतो. मला वाटतं याआधी सैराट या सिनेमाच्या टीमला कपिल शर्मा शो साठी बोलवलं गेलं होतं.

आपल्या मराठी कार्यक्रमात हिंदी कलाकारांचे प्रमोशन आपण करतो मात्र हे आपल्या बाबतीत हिंदीत फार होताना दिसत नाही. याचं शल्य मनात नक्कीच आहे. 'बाईपण भारी देवा'चं संपुर्ण यश हे तुम्हा मायबाप प्रेक्षकांचं आहे. आम्ही फक्त तुमचे प्रतिनिधी आहोत."

'इंडिया बेस्ट डान्सर' शो मध्ये बाईपण भारी देवाचे दिग्दर्शक केदार शिंदेंबरोबर शिल्पा नवलकर, दीपा परब, वंदना गुप्ते आणि सुचित्रा बांदेकर यांनी देखील शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी चित्रपटातील 'मंगळागौर' गाण्यावर डान्सही केला. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT