Bastar The Naxal Story Teaser Out  esakal
मनोरंजन

Bastar The Naxal Story Teaser : अन् 'त्या' गोष्टीचं 'JNU' मध्ये सेलिब्रेशन करण्यात आलं! 'केरळ स्टोरी'च्या दिग्दर्शकाचा पुन्हा दणका

द केरळ स्टोरीननंतर निर्माता विपुल शाह हे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्यासोबत बस्तर 'द नक्सल स्टोरी'(Bastar The Naxal Story Teaser) नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Bastar The Naxal Story Teaser Out : ज्यांनी द केरळ स्टोरी पाहिला असेल त्यांना दिग्दर्शक सुदिप्तो सेन कोण आहेत हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या द केरळ स्टोरी चित्रपटावरुन मोठा वाद झाला होता. देशभरामध्ये या चित्रपटानं वेगळा माहौल तयार केला होता. त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियाही समोर आल्या होत्या. यात आता अदा शर्माच्या द बस्तर स्टोरीचा टीझर व्हायरल झाला आहे.

'द केरळ स्टोरी'मध्ये अदा शर्मानं (Adah Sharma Latest News) मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. त्यावरुन वाद झाला होता. द केरळ स्टोरीननंतर निर्माता विपुल शाह हे (The kerala story) दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्यासोबत बस्तर द नक्सल स्टोरी (Bastar The Naxal story teaser latest marathi news) नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत. त्याचा टीझर आता समोर आला आहे, गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. सोशल मीडियावर त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे.

बस्तर द नक्सल स्टोरी नावाचा चित्रपट हा येत्या १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच्या टीझरला चाहत्यांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्या टीझर मध्ये अदा शर्मा म्हणते की, पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धामध्ये आतापर्यत आठ हजारांहून अधिक जवान शहीद झाले आहेत. मात्र तुम्हाला दुसरी गोष्ट माहिती आहे का, आपल्या देशात नक्षल्यांनी १५ हजारांपेक्षा जास्त जवानांची हत्या केली आहे.

बस्तमध्ये ७६ जवानांना नक्षल्यांनी ज्या क्रुरतेनं मारलं त्याला तुम्ही काय म्हणाल, त्यावरुन जेएनयु सारख्या विद्यापीठात सेलिब्रेशन करण्यात आले होते. आपल्या देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित विद्यापीठात जर असे होत असेल तर...बस्तरमध्ये नेमकं काय शिजतंय...असा प्रश्न विचारत अदा शर्मा म्हणते येत्या काळात या घटनांचा बंदोबस्त मी करणार आहे.

बस्तर द नक्सल स्टोरी मध्ये अदा शर्मा ही नीरजा माधवनच्या भूमिकेत दिसणार आहे. अदानं या चित्रपटाचा टीझर शेयर करताना म्हटले आहे की, निरपराध लोकांच्या रक्ताची ती कहाणी आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये सुरु झालेले शुटींग दोन महिन्याच्या आत संपवून पूर्ण केले. पहिल्यांदा हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता आता तो १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT