Bharti Singh, Harsh Limbachiyaa 
मनोरंजन

"त्याला कसं सांगू की हे बाळ त्याचं नाही"; प्रेग्नंसीबाबत भारतीचा व्हिडीओ व्हायरल

भारती सिंग लवकरच आई होणार आहे

स्वाती वेमूल

आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडियन भारती सिंग Bharti Singh लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत भारतीने चाहत्यांना ही गोड बातमी दिली. 'हम माँ बनने वाले है', असा व्हिडीओ तिने युट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे. मात्र या व्हिडीओमधील ट्विस्ट पाहून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. "त्याला मी हे कसं सांगू की हे बाळ त्याचं नाही", असं ती पती हर्ष लिंबाचियाबद्दल Haarsh Limbachiyaa बोलताना दिसते.

या व्हिडीओची सुरुवात भारतीच्या प्रेग्नंसी टेस्टने होते. गेल्या सहा महिन्यांपासून प्रेग्नंसी टेस्ट करत असल्याचं भारतीने सांगितलं. अखेर टेस्ट पॉझिटिव्ह येताच ती आनंदाने पती हर्ष लिंबाचियाकडे जाते. हर्ष झोपलेला असल्याने ती चाहत्यांसोबत बोलत असते. "पण मी कसं सांगू की हे त्याचं बाळ नाही?" त्यानंतर जोरात हसून म्हणते, "आम्हा दोघांचं हे बाळ आहे." हर्षला प्रेग्नंसीबद्दल सांगताच तो आनंदाने तिला मिठी मारतो. यानंतर कॅमेराकडे पाहून तो म्हणतो, "बरं झालं भारतीने रेकॉर्ड केलं. हम माँ बननेवाले है. सॉरी, भारती आई होणार आहे आणि मी बाबा. खरंच आम्ही खूप खूश आहोत."

बिग बॉस फेम अभिनेत्री जास्मिन भसीनने इन्स्टा स्टोरीमध्ये फोटो पोस्ट करत भारतीला शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये हर्ष, अली गोनी, पुनीत पाठक आणि त्याची पत्नी निधी सिंग हे भारतीचा बेबी बंप दाखवताना दिसत आहेत. 'बेबी लिंबाचिया कमिंग सून' असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला आहे.

भारती सध्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करत आहे. 2017 मध्ये भारती आणि हर्ष लग्नबंधनात अडकले. काही दिवसांपूर्वी भारती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली होती. कोरोनाच्या काळात आपल्याला बेबी प्लॅनिंग करायचं नाही, कोरोनात ते जास्त धोकादायक आहे, असं तिनं म्हटलं होत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

Nainital Travel: ऑफ सीजन बनला सुपरहिट! पावसाळ्यात नैनीतालमध्ये पर्यटकांची विक्रमी गर्दी, स्थानिकांची कोट्यवधींची उलाढाल

Team India Selection:भारतीय संघात श्रेयवादासाठी चढाओढ! गौतम गंभीर, अजित आगरकर यांच्यावरही 'ती' दोघं ठरतायेत वरचढ; Inside News

SCROLL FOR NEXT