Untitled-4.jpg 
मनोरंजन

'भूज'चा फर्स्ट लुक आउट; अजय देवगण उडविणार पाकिस्तानची दाणादाण

वृत्तसंस्था

मुंबई : अजय देवगणच्या 'भूज' चित्रपटाचा फर्स्ट लुक रीलिज झाला आहे. हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगनने हवाई दलातले स्कॉड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका केली आहे. तसेच हा चित्रपट पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 14 ऑगस्टला रीलिज होणार आहे.

दरम्यान, अजय देवगण, संजय दत्त, राणा डग्गुबत्ती आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या भूज चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. भुजः द प्राइड ऑफ इंडिया या सिनेमात विजय कर्णिक नावाच्या हवाई दल अधिकाऱ्याची भूमिका अजय देवगण करत आहे. याच स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांनी 1971 च्या युद्धात भारतासाठी मोठी कामगिरी बजावली होती.

1971 मध्ये भूजमध्ये पाकिस्तानने घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात अंदाधुंद गोळीबार केला होता. तिथली एअरस्पेस पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा पाकिस्तानचा डाव होता. असं झालं असतं तर भारताकडून प्रतिहल्ला होण्याची शक्यताच संपुष्टात आली असती. पण ही उद्ध्वस्त झालेली धावपट्टी विजय कर्णिक यांनी भूजच्या आसपास राहणाऱ्या 300 महिलांच्या मदतीने एका रात्रीत पुन्हा उभी केली. भारतीय हवाई दलाची विमानं या धावपट्टीवर सुरक्षित उतरली. विजय कर्णिक यांच्या कामगिरीमुळे पाकिस्ताविरोधातल्या युद्धात भारताची सरशी होऊ शकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT