Bigg Boss 16 will witness an ugly spat between Shalin Bhanot and Tina Datta  Google
मनोरंजन

Bigg Boss 16: शालिन आणि टीनानं एकमेकांची इज्जतच काढली; थेट चारित्र्यावर...

शालिन भनोट आणि टीना दत्ता यांच्यातील प्रेमप्रकरण बिग बॉसच्या घरात चांगलंच रंगत चाललं होतं पण एका क्षणात याचा दी एन्ड पहायला मिळाला.

प्रणाली मोरे

Bigg Boss 16: बिग बॉस16 या रिअॅलिटी शो चा शेवटचा टप्पा जवळ आला आहे. शो चा फिनाले फेब्रुवारीमध्ये होणार आहे. रोज का‌हीतरी नवीन बघायला मिळत आहे आणि रोज काही तरी घडत आहे. दिवसेंदिवस खेळ पण कठीण होताना दिसत आहे.

बिग बॉसच्या घरात यावेळी देखील नवं प्रेमप्रकरण सुरू झालेलं पहायला मिळालं ते म्हणजे टीना दत्ता आणि शालिन भनोट यांचे. पण याच्यात नात नक्की आहे की नाही हा प्रश्न देखील अनेकांना कायम पडत आला आहे. आता तर चक्क हे दोघे एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेताना दिसले.(Bigg Boss 16 will witness an ugly spat between Shalin Bhanot and Tina Datta)

रिअॅलिटी शो बिग बॉस 16 मधील टीना दत्ता आणि शालिन भनोट यांचे नाते आजपर्यंत कोणालाच समजले नाही. सलमानपासून प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांनीच यांच्या नात्याला खोटं ठरवलं आहे. इतकंच नाही तर खुद्द बिग बॉसही या दोघांच्या बॉन्डबद्दल बोलू नका असंही बोलताना दिसले आहेत.

याचे कारण म्हणजे शालीन आणि टीना गेममध्ये अनेकदा जवळ आले होते आणि चक्क त्यांनी मुलांचं प्लानिंग केलं होतं . पण आगामी एपिसोडमध्ये, आता हे दोघे एकमेकांच्या चारित्र्यावर कमेंट करत भांडताना दिसणार आहेत. सध्या या एपिसोडचा प्रोमो जबरदस्त व्ह्यूज मिळवताना दिसत आहे.

बिग बॉस 16 चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये शालीन निमृतला तिकीट टू फिनाले राउंडमध्ये सपोर्ट करत आहे, प्रोमोमध्ये दिसते की बिग बॉस सर्व स्पर्धकांना घराच्या कॅप्टनचे नाव विचारतो, त्यानंतर शालीन निमृतचे नाव घेतो ज्यामुळे टीना आणि प्रियांका चिडतात. या भांडणात टीना शालीनला दुतोंडी म्हणते , तुम्ही प्लॅनिंग आणि प्लॉटिंग केल्याचे आरोप करते, त्यानंतर शालीनपण गप्प बसत नाही. पार चढल्यावर तो थेट बोलताना दिसतो की, 'टीना तू किती खोटी आहेस. जर एक माणूस तुमच्याशी संबंध तोडतो, तर तु लगेच दुसऱ्याशी संबंध जोडते'.

शालीनचं हे बोलणं ऐकून टीना दत्ताचा पारा इतका चढतो की ती अनेकदा शालिनच्या अंगावर धाऊन जाताना दिसते. टीना या संपूर्ण प्रकरणात शालीनची एक्स वाईफ दलजीत कौरचे नाव घेते आणि म्हणते की जिथे हा आपल्या पत्नीची प्रतिष्ठा राखू शकला नाही. मग मी याच्याकडून काय अपेक्षा करावी. यानंतर तर टीना दत्तानेही शो सोडण्याचा हट्ट धरला आहे आता हे संपूर्ण प्रकरण कुठपर्यंत जाते हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Tamil Nadu CM Vijay: तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा अनोखा निर्णय! जन्मलेल्या प्रत्येक बाळाला मिळणार सोन्याची अंगठी; 'मामा'ची अनोखी भेट

Maharashtra News: मुख्यमंत्र्यांच्या परस्पर भेटीवरून नाराजी? सुनेत्रा पवारांकडून विचारणा; तटकरे यांचा इन्कार

Pune Rain: पुणेकरांना दिलासा! आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन; पुढील २-३ दिवस हलक्या सरींचा अंदाज

Miraj Assembly Constituency : 'मिरज मतदारसंघ खुला झाला तरी मी निवडणूक लढवणारच'; आमदार खाडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, राजकीय समीकरणे बदलणार?

SCROLL FOR NEXT