Bigg Boss 17  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: "आपलं लग्न झालयं हे विसर....", रागाच्या भरात अंकिताने नवऱ्याला मारली लाथ, व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये आता पर्यंत अनेक चढ उतार पहायला मिळाले आहे. त्यातच विकेंड का वार मध्ये सलमान खानने मन्नारा आणि खानजादीचा चांगलाच क्लास घेतला तर दुसरीकडे बिग बॉसमधील कपलला देखील सलमानने चांगलच फटकारलं आहे. सलमान खानने ऐश्वर्याला चांगलंच सुनावलं. मात्र आता बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकी जैन यांचे जोरदार भांडण झाले आहेत.

बिग बॉसच्या घरात गेल्यापासून अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात भांडण करत आहे. दोघांचे नेहमी वाद होताना दिसत आहे. त्यातच आता या दोघांमधील वाद चांगलाच वाढला आहे. आता अंकिताने विकीसोबत गैरवर्तन केले त्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला आहे.

निर्मात्यांनी 13 नोव्हेंबरच्या एपिसोडचा प्रोमो सोशल मिडियावर शेयर केला आहे. आता वीकेंड का वारमध्ये सलमान खानने विकीला त्याच्या पत्नीशी वाईट वर्तन केल्याबद्दल फटकारले आहे.

या प्रोमोत दाखवल्याप्रमाणे विकी जैनला 'दिल का घर' मधून 'दिमाग का घर'मध्ये टाकण्यात आलं आहे. त्यामुळे आता अंकिता त्याच्यासोबत राहणार नाही त्यामुळे अंकिता दु:खी होते. मात्र विकी दुसरीकडे हसताना आणि बाकीच्या स्पर्धकांसोबत मज्जा करताना दिसतो.

यानंतर बिग बॉस अंकिताला बोलतात की, ज्याच्यासाठी ती दु:खी आहे तो तिकडे नाचत आहे. हे ऐकल्यानंतर अंकिता संतापते. नंतर जेव्हा विकी जैन अंकिताला समजवायला येतो तेव्हा ती चिडते आणि त्याला म्हणते, 'असं करू नकोस. मी तुला लाथ मारेल. तू खरोखर खुप स्वार्थी आणि मूर्ख आहेस. तुझ्यासोबत राहून माझं नशीब खराब झालयं. आपलं लग्न झालयं हे विसरुण जा. आजपासून तू वेगळा आणि मी वेगळी आहे.'

नुकतच या 'वीकेंड का वार'मध्ये सलमानने विकी जैन आणि ऐश्वर्या शर्माला नाते सुधरवण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता अंकिता आणि विकी यांच्यातील वाद टोकाला गेल्यामुळे याचे परिणाम काय होतात हे तर पुढच्या भागातच समजेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT