Ankita Lokhande Pregnant?  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: अंकिताची प्रेग्नेंसी खरी की खोटी? अखेर सर्वांसमोर सत्य आलंच!

काही दिवसांपूर्वी रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' मधील अंकिता लोखंडेची प्रेग्नेंसी टेस्ट करण्यात आली होती.

Vaishali Patil

Bigg Boss 17: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सध्या बिग बॉसच्या घरात बंद आहे. ती या घरातील सर्वात लोकप्रिय स्पर्धक आहे. त्याबरोबरच ती घरात सर्वात जास्त फी घेतलेली स्पर्धक देखील आहे.

मात्र बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर तिच्या चाहत्यांना जशा खेळाची अपेक्षा होती तसा खेळ अंकिता खेळत नसून केवळ व्हिक्टीम कार्ड प्ले करत असल्याच्या चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे.

अंकिता या घरात तिचा पती विकी जैनसोबत गेली आहे. लोकांना वाटलं की ती विकीसोबत या घरात खुप तगडी स्पर्धक बनेल मात्र दिवसेंदिवस तिचे आणि विकीचे भांडण होत आहे.

कधी अंकिता आणि विकी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करतात, तर कधी एकमेकांसोबत भांडताना दिसतात. त्यातच अलीकडेच अंकिताची प्रकृती शोमध्ये बिघडली होती.

त्यानंतर ती प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे बिग बॉसच्या घरात तिची प्रेग्नेंसी टेस्ट करण्यात आली. आता अंकिता लोखंडेच्या प्रेग्नेंसी टेस्टचा रिपोर्ट समोर आला आहे.

रिपोर्ट आल्यानंतर अंकिता लगेचच रिअॅलिटी शो सोडणार असल्याचा दावा केला जात होता, पण आता असं काहीही होणार नाही आहे. कारण अंकिता लोखंडेची प्रेग्नेंसी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ती सध्या आई होणार नाहीये.

अंकिता लोखंडेच्या सर्व प्रकारच्या चाचण्या झाल्या असून त्या सर्व निगेटिव्ह आल्या आहेत. याचा अर्थ सध्या अंकिता या शोमधून बाहेर पडणार नाहीये. ही बातमी समोर आल्यानंतर तिचे चाहते खुश आहे तर दुसरीकडे अंकिता आई होणार नसल्याच्या बातमीने काहीसे नाराजही आहेत.

तर दुसरीकडे सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे ज्यात अंकिता आणि विकी जैनची आई त्यांना बिग बॉसमध्ये भेटण्यासाठी आल्याचे दाखवण्यात आले आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन त्यांच्या आईला पाहून खूपच भावूक झाले आहेत.

यात विकीची आई दोघांना रागवताना दिसते. त्या म्हणतात की, 'घरी असं कधीच झालं नाही आणि इथे तुम्ही किती भांडणं करत आहात. जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटतात तेव्हा प्रेमाने भेटा. एकमेकांवर प्रेम करा.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT