Bigg Boss Marathi 4 common man trishul marathe eliminated left the house sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: 'कॉमन मॅन'ची एक्झिट; त्रिशूल मराठे घराबाहेर..

'बिग बॉस'च्या घरातून 'कॉमन मॅन' म्हणून एंट्री घेतलेला त्रिशूल मराठे काल घराबाहेर पडला.

नीलेश अडसूळ

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi)च्या चौथ्या पर्वातून चौथा सदस्य काल घराबाहेर पडला. गेली काही दिवस कोणत्याच वादात किंवा चर्चेत नसणाऱ्या त्रिशूल मराठेला काल निरोपाचा नारळ देण्यात आला.

त्रिशूल मराठे हा घरात कॉमन मॅन म्हणून आला होता. सामान्य प्रेक्षकांचे प्रतिनिधित्व करणारा एक व्यक्ती यंदा बिग बॉस च्या घरात असणार असे सांगण्यात आले होते. त्यानुसार त्रिशूलची एंट्री झाली. सुरवातीला त्रिशूल चांगला खेळला. पण नंतर मात्र त्याच्याकडून फारसे मनोरंजन झाले नाही आणि अखेर पाच आठवड्यांनी त्याने बिग बॉसच्या घरातून निरोप घेतला. कालच्या भगत त्रिशूल घरा बाहेर पडताना दिसला.

त्याला निरोप देताना मांजरेकर म्हणाले, 'एका चांगल्या माणसाला घराबाहेर जावं लागत आहे. तुझ्यासारखा लकी प्रेक्षक बिग बॉसच्या घराचा सदस्य झाला याचा मला आनंद झाला होता.' त्रिशूल मराठे सामान्य प्रेक्षक म्हणून सहभागी झाला असला तरी आता मात्र तो सेलिब्रिटी झाला आहे. त्रिशूलला अभिनयाची आवड असल्याचे त्याने या शो मध्ये बोलून दाखवले आहे, त्यामुळे आता त्रिशूलच्या आयुष्यात काय बदल घडतोय का, त्याला मालिका, सिनेमांसाठी विचारणा होतेय का ही लवकरच कळेल.

एअरटेल लकी कॉलरच्या माध्यमातून त्रिशूल मराठे बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी झाला होता. बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात मांजरेकरांचं मन जिंकणारा त्रिशूल दुसऱ्या आठवड्यापासूनच घरात दिसेनासा झाला होता. त्याचा खेळही ढेपळला शिवाय तो कोणत्याच विषयावर आपले मत मांडत नव्हता. याबाबत त्याला चावडीवर मांजरेकरांनी कल्पनाही दिली होती. परंतु त्यांच्या खेळात सुधारणा झाली नसल्याने त्याला निरोप देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT