Bigg Boss Marathi 4: Fight between Rakhi Sawant and Amruta Dhongade Esakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: होते अक्षय आणि प्रसाद म्हणून वाचली अमृता..नाहीतर राखीनं तर धोंगडेला..

राखी सावंत आणि अमृता धोंगडे मध्ये मोठा राडा झाल्याचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी ४ चं पर्व आता त्याच्या शेवटाकडे प्रवास करत आहे. शो च्या उत्तरार्धात मोठे राडे आपल्याला पहायला मिळत आहे. खरंतर आता घरात ४ पुरुष आणि ३ महिला उरल्यात. पण पुरुषांपेक्षा स्त्रियाच अधिक भांडताना घरात दिसत आहेत. एकमेकींचे एकमेकींविरोधात कान भरणं इथवर ठीक आहे हो..पण थेट दोन महिलांची हाणामारी ती देखील तुंबळ युद्धागत पहायला मिळणं हे जरा अतिच होताना दिसतंय. आता सध्या जो प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यानं तर डोळे अन् कान दोन्हीवर हात ठेवायची वेळ आली.(Bigg Boss Marathi 4: Fight between Rakhi Sawant and Amruta Dhongade)

सध्या बिग बॉस मराठीचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात अमृता धोंगडेनं पुन्हा 'मी नाही त्यातली,कडी लाव आतली' या आपल्या स्वभावाची पुन्हा एकदा झलक दाखवली. त्याचं झालं असं की राखी सावंत वॉशरुममध्ये असताना अमृतानं बाहेरुन दरवाजाला कडी लावली. आणि राखी बराच वेळ वॉशरुममध्ये अडकून पडली...आता राखीच ती...पारा चढल्यावर ती काय करु शकते याचा अंदाज एव्हाना राखीला ओळखणाऱ्यांच्या लक्षात आलाच असेल.

दरवाजा उघडला अन् घरातील प्रत्येकाला राखीचा रुद्रावतार पहायला मिळाला. जेव्हा तिला कळलं की ही करतूत अमृताची आहे तेव्हा आधीतर तिनं आपला चेहरा रंगवला...केस मोकळे केले अन् थेट अमृताच्या अंगावर बादलीभर पाणी आणून ओतलं अन् तिचा मागनं गळाच पकडल्या सारखं प्रोमो व्हिडीओत दिसत आहे. राखीच्या तावडीतून अमृता धोंगडेला सोडवायला अक्षय अन् प्रसाद गेले म्हणून थोडक्यात बचावली ती.. नाहीतर राखीनं तिचं काय केलं असतं हे देवच जाणे. सध्या हा प्रोमो पाहून लोकांना आजचा एपिसोड पहायची उत्सुकता लागून राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

SCROLL FOR NEXT