Bigg Boss Marathi 4 teams planning for seesaw game sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: आणि मग आपला कार्यक्रम सुरू करायचा.. अक्षय आखतोय रणनीती..

दोन टीममध्ये सुरू आहे रणनीती.. अमृता धोंगडे आणि समृध्दीमध्ये वाद!

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीचा खेळ सुरू होऊन आता चार आठवडे झाले. टास्क, वाद भांडण आणि राडे यांचे सत्र सुरूच आहे. कुरघोडी, एकमेकांवर गेम करणे हे सुरूच आहे. सध्या बिग बॉसच्या घरात स्नेहलता वसईकरची वाइल्ड कार्ड एंट्री झाली असल्याने नवे समीकरण तयार होत आहे. आठवड्याच्या शेवटी कदाचित दोन टीमच्या तीन टीम झालेल्या दिसतील. खेळासाठी आणि घरात टिकण्यासाठी स्पर्धकांची चांगलीच रणनीती सुरू आहे.

(Bigg Boss Marathi 4 teams planning for seesaw game)

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन्ही टीम रणनीती आखताना दिसणार आहेत. कारण बिग बॉस ने त्यांना 'सी सॉ' हा टास्क दिला आहे. बिग बॉस मधील हा सर्वात मोठा टास्क आहे. त्यासाठी एकीकडे तेजस्विनीची टीम तर दुसरीकडे अक्षयच्या टीममध्ये जोरदार प्लॅनिंग सुरू आहे. तेजस्विनी म्हणाली, मला वाटतं किरण दादा, विकास पहिले त्यांनतर अमृता धोंगडे लगेच म्हणाली, आम्ही दुसरे जाणार आणि त्यावर समृध्दीचे म्हणाली नाही मला जायची ईच्छा आहे मी तुला आधीच बोले होते तेजु. तेजस्विनीसाठी हा निर्णय घेणं कठीण होऊन बसणार आहे कारण तिचं म्हणणं आहे तुम्ही सगळेच स्ट्रोंग आहात. त्यावर समृध्दी म्हणाली पण लास्ट टाईम मी काहीच परफॉर्म नाही केलं आहे त्यामुळे खरंच मला जाउद्या...

त्यावर अमृता म्हणाली, पण तुला मिळणार आहे परफॉर्म करायला. आणि यावरून समृध्दी आणि अमृता मध्ये वादावादी सुरू झाली. समृध्दी म्हणाली, मी देखील तुला असं बोलूच शकते. दुसरीकडे अक्षय आणि टीम चर्चा करताना दिसणार आहेत. तर अक्षय टीमला सांगणार आहे, आपल्याला जो वाटतो आहे एक त्याला टार्गेट करायचे आणि दुसरा असाच टाईमपास करायचा. जर चार असतील तर तीन जणांनी एकावर टार्गेट करायचं आणि एकाने एकावर ...साध्या पाण्याने आंघोळ घालून थंड करून टाकायचे गेल्या गेल्या आणि मग आपला कार्यक्रम सुरू करायचा. अशा रणनीती दोन्ही टीम मध्ये आखल्या जात आहे. एका टीमने आपली हुशारी दाखवली आज दुसरी टीम खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT