bigg boss marathi fame actress megha dhade congratulate pm narendra modi SAKAL
मनोरंजन

PM Modi: "सनातन हिंदू धर्म संपवण्याचे भाष्य करणार्‍यांना...", मराठी अभिनेत्रीने केलं पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीने पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय

Devendra Jadhav

PM Modi News: काल चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेश अशा चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये तीन राज्यात भाजपचं वर्चस्व दिसुन आलं. तेलंगणा वगळता इतर तिन्ही राज्यांमध्ये भाजप विजयी झालेली दिसुन येतेय.

अशातच बिग बॉस मराठी १ ची विजेती अभिनेत्री मेघा धाडेने भाजपच्या विजयबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय.

मेघा धाडेने नरेंद्र मोदींचं अभिनंदन करणारा फोटो शेअर केलाय. या फोटोखाली मेघा लिहीते, भारतीय जनता पार्टी झिंदाबाद....
जय श्रीराम...
तिन्ही राज्यातल्या जनतेचे मनापासून अभिनंदन...
तिन्ही राज्यातल्या कार्यकर्त्यांचे
मनापासून अभिनंदन...
तेलंगणा राज्यातही भाजपाचा प्रवेश झाला....तेथील जोमाने काम करणार्‍या पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन...

मेघा धाडे शेवटी लिहीते, "सनातन हिंदू धर्म संपवण्याचे भाष्य करणार्‍या पक्षांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली....

सहकाऱ्यांनो आपणही अशीच मेहनत घेऊन येणाऱ्या निवडणुकांमधे मिळणार्‍या यशात, सांस्कृतिक प्रकोष्ठ म्हणून खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलू.... जय हिंद.."

अभिनेत्री कंगना रणौतनेही केलं मोदींचं कौतुक

काल निवडणुकीचे निकाल पाहून कंगना रणौतनेही एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'जो सनातन रावणाच्या अहंकाराने मिटला नाही, जो सनातन कंसाच्या गर्जनेनेही डळमळला नाही, जो सनातन बाबरच्या अत्याचाराने मिटला नाही आणि जौ सनातन औरंगजेबाच्या अत्याचाराने मिटला नाही. हाच सनातन पप्पू पनौतीच्या प्रयत्नाने संपेल का? याशिवाय प्रभु रामाचे आगमन झालंय, अशा शब्दात कंगनाने मोदींचं कौतुक करत राहूल गांधी आणि कॉंग्रेसवर निशाणा साधलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT