Megha Dhade Esakal
मनोरंजन

Megha Dhade: बिग बॉस विजेती मेघा धाडेची भाजपच्या 'या' पदी लागली वर्णी! पोस्ट करत म्हणाली,

Vaishali Patil

गेल्या काही दिवसांपासून मराठी कलाकार विविध राजकीय पक्षात प्रवेश करत आहेत. नुकताच सुप्रसिद्ध मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकरने भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केलाय. प्रिया बेर्डे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत अभिजीतने भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केलाय.

तर यावेळी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वांची विजेती आणि अभिनेत्री मेघा धाडे हिच्याकडे देखील भारतीय जनता पार्टीने मोठी जबाबदारी सोपवली आहे. काही दिवसांपुर्वीच मेघाने भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला होता तिच्या BJP प्रवेशामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

तिने जून महिन्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थिीतत राजकारणात प्रवेश केला. आता BJP ने त्याच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपवल्याने पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.

मेघानं स्वत:या बाबत पोस्ट शेयर करत माहीती दिली. आता मेहाची भाजप महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियूक्ती करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिला या पदाची सुत्र सोपवण्यात आली. यावेळी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे देखील उपस्थीत होत्या.

या कार्यक्रमाचे फोटो शेयर करत तिने लिहिले, "आज माझी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेश महामंत्री माननीय विजयजी चौधरी, माझी लाडकी सांस्कृतिक प्रकोष्ठची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा प्रियाताई बेर्डे यांच्या उपस्थितीत माझी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली.

तसेच माझ्याबरोबर अनेक कलाकारांचे पक्षप्रवेश करण्यात आले.मला प्रिया ताईनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडून अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून जोमाने काम करीन हा जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार..."

तिची पोस्ट आता चर्चेत आहे. अनेक कलाकार मंडळी आणि तिच्या चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील पुर्णेकर कुटुंबियांच्या भेटीला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत दाखल

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT