Bobby Deol Animal Actor Ranbir Kapoor performance esakal
मनोरंजन

Bobby Deol Animal Movie : रणबीरपेक्षा बॉबीनं खाल्ला भाव, एकेकाळी पाच वर्ष घरात बसून होता! कसे बदलले दिवस?

संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलनं मोठी क्रेझ तयार केली आहे. त्याची मोठी चर्चा आहे.

युगंधर ताजणे

Bobby Deol Animal Actor Ranbir Kapoor performance : संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलनं मोठी क्रेझ तयार केली आहे. आज प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. रणबीर कपूर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका असला तरी त्याच्या जोडीनं बॉबी देओलच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे.

या सगळ्यात व्हायरल झालेले मीम्स, फोटो आणि व्हिडिओवरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यात नेटकऱ्यांनी बॉबीची मुक्तकंठानं प्रशंसा केली आहे. अॅनिमल पाहिला त्यात रणबीरनं कमाल केली आहेच पण बॉबीही काही कमी नाही. त्याच्या इंट्रीनं अॅनिमलची रंगत आणखी वाढवली आहे. अॅनिमलचा टीझर आणि ट्रेलर व्हायरल झाला होता त्यावेळी रणबीरपेक्षा जास्त कौतुक बॉबीच्या वाटेला आलं होतं.

राजस्थान निवडणुकीत महिला, सिलेंडर आणि जातीय मुद्दा.! (Rajasthan Assembly Election 2023 )

संदीप रेड्डी वांगा हा त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक आहे. त्याच्या यापूर्वीच्या चित्रपटांकडे पाहिल्यास तो कोणत्या प्रकारचे चित्रपट करण्यास प्राधान्य देतो हे कळून येईल. अर्जून रेड्डी, कबीर सिंग या चित्रपटांनी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची, समीक्षकांची पसंती मिळवली आहे. त्यात आता अॅनिमलची भर पडली आहे. बॉबीनं त्यात रणबीरपेक्षाही सरस अभिनय केला आहे असे बॉबीच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

आता बॉबीच्या गेल्या काही वर्षांपासूनच्या वेगवेगळ्या बातम्यांना उधाण आले आहे. करिअरच्या एका काळात पूर्णपणे डी फोकस झालेल्या बॉबीला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं केलं होतं. हे बॉबीनं अनेक मुलाखतीतून सांगितलं आहे. त्यानंतर गेल्या दोन तीन वर्षात बॉबीच्या करिअरनं मोठी झेप घेतल्याचे दिसून आले आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रम नावाच्या मालिकेतून बॉबीला प्रचंड लोकप्रियता मिळाल्याचे दिसून आले आहे. त्या मालिकेचे आतापर्यत तीन सीझन आले आहेत. त्याच्या तीनही सीझनला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली आहे. त्यात बॉबीच्या भूमिकेचा वाटा मोठा होता. आता अॅनिमलमध्ये बॉबीची भूमिका पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी बॉबीच्या संघर्षाविषयी सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या आहेत.

बॉलीवूडमधील कित्येक समीक्षक आणि ट्रेड अॅनालिस्टचे असे म्हणणे आहे की, ही फिल्म बॉबीच्या करिअरसाठी महत्वाची भूमिका बजावणारी ठरेल यात शंका नाही. १९९५ मध्ये राज कुमार संतोषी यांच्या बरसात फिल्म मधून डेब्यू करणाऱ्या बॉबीच्या करिअरचा ग्राफ हा नेहमीच चढता-उतरता राहिला आहे. २००२ मध्ये त्याचे करिअर स्थिर होते. त्यानंतर मात्र त्यानं वेगळे वळण घेतल्याचे दिसून आले.

बॉबीच्या करिअरमधील पाच वर्षे अशी होती की त्यामुळे तो पूर्णपणे निराश झाला होता. त्याच्याकडे कोणतेही प्रोजेक्ट नव्हते, मालिका अथवा जाहिरातीही नव्हत्या. अशावेळी त्याला सलमानचा मोठा आधार मिळाला. त्यानंतर आलेल्या आश्रम मालिकेनं मात्र त्याच्या करिअरचा ग्राफ वेगानं वरती गेल्याचे सांगण्यात येते. आता तो रेड्डी वांगाच्या अॅनिमलमध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT