मनोरंजन

अभिनेत्री काजोलच्या बहिणीला कोरोनाची लागण

ज्या अभिनेत्रीनं आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांची पसंती मिळवली ती काजोल नेहमीच चाहत्यांच्या गप्पांचा विषय असतो.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - ज्या अभिनेत्रीनं आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांची पसंती मिळवली ती काजोल नेहमीच चाहत्यांच्या गप्पांचा विषय असतो. तिच्या चित्रपटांची जादू अजूनही कायम आहे. सोशल मीडियावर काजोल चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी तिचा एक चित्रपट आला होता. त्यामध्ये ती तिच्या बहिणीसमवेत दिसली होती. आता गंभीर बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीनुसार सध्या ती होम आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.

काजोलची बहिण तनीषा मुखर्जीला कोरोना झाला आहे. तिनं सोशल मीडियावर त्यासंबंधी पोस्ट शेयर करुन माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांनी स्वताला होम क्वॉरनटाईन करुन घेतलं आहे. तनिषाला जरी काजोल एवढं फेम मिळालं नसलं तरी काही चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. यापूर्वी तिनं मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका बिग बॉसमध्येही तिचा सहभाग होता. त्यावेळी तिला चाहत्यांची पसंती मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांना कोरोना झाला होता. त्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

तनीषानं सोशल मीडियावर कोरोना संक्रमित झाल्याची माहिती देताना लिहिलं आहे की, सर्वांना नमस्कार, मी कोरोना संक्रमित झाले आहे. त्यासाठी मी स्वत काही दिवस होम आयसोलेशन मध्ये राहणार असल्याचे सांगितलं आहे. तनिषा अशा सेलिब्रेटींपैकी आहे ज्यांनी कोरोना महामारीच्या वेळेस कामाला सुरुवात केली होती. याच वर्षी लखनऊमध्ये एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये ती व्यस्त होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EL NINO IMPACT : 'सुपर एल निनो'चा भारतावर काय होणार परिणाम? गेल्या 7 दशकांतील सर्वात तीव्र हवामान बदलाचा इशारा; देशात माॅन्सूनचा पाऊस 14 टक्के कमी!

ढिंग टांग : डीजे : शाप की वरदान..!

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरांगे आक्रमक; उपमुख्यमंत्री शिंदे-खासदार जाधवांना निवडणुकीत जागा दाखवण्याचा इशारा

Marathi News Live Updates : 'वसुधैव कुटुंबकम्'चा विचार स्वीकारा; इतरांची सेवा करणे हे आपले कर्तव्य - मोहन भागवत

अर्थवेध : आमचं काय चुकलं?

SCROLL FOR NEXT