Bollywood Actress Kangana Ranaut Breaks Silence On News Of Contesting 2024 Lok Sabha Elections  Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: फ्लॉप चित्रपटांची रांग लागताच कंगना वळणार राजकारणाकडे? लोकसभा निवडणूकीबाबत अखेर सोडलं मौन

निवडणूकीबाबत आता कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.

Vaishali Patil

Kangana Ranaut: गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौत तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा नुकताच रिलिज झालेला तेजस सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला. कंगना नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लाईमलाईटमध्ये राहते. ती नेहमी सोशल मिडियावर काही ना काही पोस्ट शेयर करत असते. त्यातच आता कंगना राजकारणात येणार अशा चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरु होत्या.

कंगना रणौत हिने 2024 ची लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या झाल्यानंतर कंगनाने या अफवा फेटाळल्या आहेत.

अभिनेत्री कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, माझे नातेवाईक आणि मित्र मी हे पाठवत आहे. त्यांना वाटत आहे की हे हेडलाईन मी दिली आहे. परंतु ही हेडलाइन आणि बातमी माझ्याकडून देण्यात आलेली नाही.

कंगना राणौत अनेक दिवसांपासून राजकीय मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करताना दिसत आहे. कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, या पोस्टनंतर अभिनेत्री निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र आता कंगना राणौतच्या या पोस्टनंतर ती 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणारी ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कंगनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती तेजस या चित्रपटात दिसली होती. कंगना रणौतने तमिळ कॉमेडी-हॉरर सिक्वेल चंद्रमुखी 2 मध्येही काम केले . आता ती 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT