Bollywood Celebrity New Year Celebration  Google
मनोरंजन

New Year 2023: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कुठे गेलेयत बॉलीवूडकर?, जाणून घ्या प्रत्येकाचं डेस्टिनेशन...

बॉलीवूडच्या काही कलाकारांनी नव वर्षाच्या स्वागतासाठी गाठलंय दुबई तर काहींनी लंडन-पॅरिस तर कुणी भारतातीलच ऐतिहासिक ठिकाण...

प्रणाली मोरे

New Year 2023: नवं वर्षांच स्वागत करण्यासाठी अख्खं जग सज्ज झालं आहे. प्रत्येकानं कैक महिने आधी आपले नवं वर्षाचे प्लॅन्स बनवले असतील तर कुणी अगदी आयत्यावेळेस ते बनवले असतील. पण अशा खास दिवशी प्रत्येकाला आपलं फेव्हरेट डेस्टिनेशन मजा करण्यासाठी गाठायच असतं किंवा कुणाला आपल्या फेव्हरेट लोकांसोबत आनंद लुटायचा असतो.

मग असं असताना आपले बॉलीवूडकर कसे मागे राहतील बरं? आपले स्टार्सही भारत सोडून परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेयत. कोणी दुबई तर कुणी स्वित्झर्लंड तर कुणी आबूधाबी च्या सौंदर्यामध्ये आनंद लुटायला निघून गेलंय. अर्थात चाहत्यांसोबतही आपल्या या स्टार्सनी त्यांचे डेस्टिनेशनवरचे फोटो शेअर केले आहेत. चला जाणून घेऊया आपले हे लाडके कलाकार कुठे गेलेयत फिरायला?

नवं नवं लग्न झालेली मौनी रॉय आणि सूरज नांबियार नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आबू धाबीला पोहोचलेयत. मौनीनं तिथले डोळ्याचं पारणं फेडणारे फोटो शेअर केलेयत बरं का.

रकुल प्रीत सिंग

बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने देखील जगातील असंच एक छानसं डेस्टिनेशन फुकेत गाठलं आहे. थायलंडच्या जवळच असलेलं हे बेट रकुलनं शेअर केलेल्या फोटोतून आपल्यालाही त्याच्याकडे येण्यासाठी मजबूर करेल यात शंकाच नाही.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी

हे दोघेही लव्ह बर्ड्स नववर्ष साजरं करण्यासाठी दुबईला रवाना झाले आहेत. तिथे पार्टी करतानाचे त्यांचे फोटो समोर आले आहेत. बरं हे फोटो शेअर केलेयत फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं.

वरुण धवन आणि नताशा दलाल

वरुण धवन,नताशा दलाल या दाम्पत्यासोबत अर्जुन कपूरलाही एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं. याव्यतिरिक्त अर्जुन कपूरने देखील एक फोटो शेअर केला आहे,ज्यात अनिल कपूर देखील दिसत आहेत.

कृती सनन

बॉलीवूड अभिनेत्री कृती सननने देखील सेलिब्रेशनसाठी परदेश गाठलं आहे.

सैफ अली खान-करिना कपूर खान

या दाम्पत्यानं आपल्या मुलांसोबत केव्हाचच स्वित्झर्लंड गाठलं आहे.

कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन एकटाच पॅरिसला रवाना झाला आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

कतरिना कैफ-विकी कौशल

कतरिना कैफ आणि विकी कौशल ख्रिसमसनंतर राजस्थानला रवाना झाले होते. तिथल्या जंगलात फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ कतरिनानं शेअर केले होते. राजस्थान आपल्या आवडत्या डेस्टिनेशन्सपैकी एक आहे असं ती म्हणाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

Pune Highway CCTV: अष्टविनायक महामार्गावरील शिंगवे फाट्यावर चार उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही; वाहतूक नियंत्रण व गुन्हे प्रतिबंधाला चालना

जमिनीतून गूढ आवाज अन् भूकंपाचे धक्के; नागरिकांनी थेट घराबाहेर घेतली धाव, हिंगोलीतील प्रकार

Shubman Gill ने भारताच्या टी२० संघात कमबॅकवर अखेर सोडलं मौन; GT ला फायनलमध्ये नेल्यावर म्हणाला, 'जर माझी निवड...'

SCROLL FOR NEXT