Hera Pheri 3 esakal
मनोरंजन

Hera Pheri 3: अक्षय विना हेराफेरीच नाही! ट्विटर होतोय ट्रेंड व्हायरल...

सकाळ डिजिटल टीम

'हेरा फेरी' हा सिनेमा चाहत्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आजही या चित्रपटाला चाहते आवडिने पहातात. या चित्रपटाचे दोन्ही भाग फारचं गाजले अन् याचा पुढचा भाग म्हणजे हेरा फेरी 3 येणार ह्या बातमीने चाहत्याच्या उत्साहाला उधान आले होते मात्र त्यातच या 'हेराफेरी 3' मध्ये कार्तिक आर्यनची एंन्ट्री झाल्याची माहिती समोर आली. परेश रावल यांनी या बातमीला कन्फर्म केलं होतं.

चित्रपटातील बाबू राव म्हणजेच भूमिका करणाऱ्या परेश रावल यांनी हेरी फेरी 3 मध्ये कार्तिक आर्यनच्या एन्ट्रीबद्दल सांगितल्यानंतर चाहत्यांची निराशा झाली आहे. सोशल मीडियावर, युजर्स अक्षय कुमारच्या जागी कार्तिक आर्यनला घेतल्याने विविध प्रकारचे प्रश्न विचारत आहेत.

खरं तर, शुक्रवारी एका चाहत्याने परेश रावल यांना ट्विट करून विचारले होते की कार्तिक आर्यन हेरा फेरी 3 चा भाग असेल का? त्याला उत्तर देताना परेश रावल म्हणाले होते की, हो हे खरे आहे.

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

समोर आलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार चित्रपटाच्या स्क्रिप्टवर खूश नव्हता. निर्मात्यांसोबत अनेक मिटिंग करूनही काही फायदा झाला नाही, त्यामुळे त्याला चित्रपटातून रिप्लेस करण्यात आले आहे. त्याचवेळी, आता राजू अर्थात हेरा फेरीच्या अक्षय कुमारचे चाहते ट्विटरवर नाराजी व्यक्त करत आहेत आणि ते म्हणतात की अक्षय नसेल तर चित्रपट नाही. ट्विटरवर #No Akshay No Hera pheri हा ट्रेंड व्हायरल होत आहे तर मीम्सही व्हायरल होत आहेत. 

 यावर एका यूजरने लिहिले की, जर परेश रावल हेरा फेरीचे हृदय आहे तर अक्षय कुमार आत्मा आहे. अक्षय कुमारशिवाय ‘हेरी फेरी’ हा एखाद्या आत्मा नसलेल्या मृतदेहासारखा असेल. दुसर्‍याने लिहिले की, जेव्हा कोणी म्हणतो की त्याने अक्षय कुमारच्या जागी हेरा फेरी 3 मध्ये कार्तिक आर्यनला घेतले आहे, तेव्हा माझी प्रतिक्रिया अशी आहे की अक्षय कुमार नाही तर हेरी फेरी 3 नाही.

सोशल मीडिया यूजर्स अक्षय कुमारला टॅग करत आहेत आणि म्हणतात की अक्षय या चित्रपटाचा भाग असल्याशिवाय तो चित्रपट अपूर्ण आहे. एकाने लिहिलंय, प्लीज अक्षय सर, तुमच्या आणि तुमच्या या पोजशिवाय हेरीफेरी अपूर्ण आहे... तर दुसऱ्याने लिहिले, रामाशिवाय रामायण, कृष्णाशिवाय महाभारत आणि अक्षय कुमारशिवाय हरिफेरी अपुर्ण आहे.

याशिवाय आणखी एकाने लिहिले की, 'आम्ही आमच्या लहानपणीच्या आवडत्या व्यक्तिरेखेला उध्वस्त होऊ देणार नाही', तर दुसरा म्हणाला, 'हा केवळ चित्रपट नाही, आमचं इमोशन आहे, आम्ही राजूची भुमिका खराब करु देणार नाही'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT